कोकण

वेताळबांबर्डेत आग लागून घरासह बागायतीची हानी

CD

97840
वेताळ बांबर्डे ः येथे शनिवारी लागलेल्या आगीत काजू बागेचे झालेले नुकसान.
97841
वेताळ बांबर्डे ः आगीत घराचेही मोठे नुकसान झाले.


वेताळ बांबर्डेत आग लागून
घरासह बागायतीची हानी
---
कारण गुलदस्त्यात; नारळ, काजूचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ ः वेताळ बांबर्डे- गडकरीवाडी- वाघभाटलेवाडी येथे लागलेल्या भीषण आगीत बागायतीसह घराचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, त्यात सुमारे चार लाख ८० हजारांचे नुकसान झाले.
आगीत गडकरीवाडी येथील चंद्रकांत महादेव गायकवाड यांच्या काजू, नारळ बागेचे मोठे नुकसान झाले. त्यांची सुमारे ४५ काजू कलमे खाक झाली. यात अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. दीपक पुरुषोत्तम बांबर्डेकर यांच्या घरालाही आग लागून लाकडी सामान, पत्रे, खुर्च्या, वीज फिटिंग यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. विठ्ठल भगवान पार्टे व अरविंद बाळकृष्ण डांगे यांच्या शेतातील गोवर जळून अनुक्रमे १० हजार व पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. रवींद्र गावडे यांच्या गवताची गंजी जळून १५ हजारांचे नुकसान झाले. वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, पोलिसपाटील दीपाली भोगले, ग्रामपंचायत सदस्य साजूराम नाईक, देवेंद्र सामंत, राजू यादव यांनी नुकसानाची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Solapur Cyber Fraud,पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला ४५ लाखांचा गंडा, जादा नफ्याचे आमिष महागात; वर्षाला २८ लाखांचे आहे पॅकेज

SCROLL FOR NEXT