कोकण

काजू बोंडू उत्पादने उत्पन्नाचा स्रोत

CD

98098
वेंगुर्ले ः विजय व दीपाली बावसकर यांनी शास्त्रज्ञ, काजू कारखानदार व काजू उत्पादक यांच्याशी चर्चा केली.

काजू बोंडू उत्पादने उत्पन्नाचा स्रोत

विजय बावसकर; वेंगुर्लेत उत्पादक, कारखानदारांशी चर्चा

वेंगुर्ले, ता. २३ ः कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडूपासून काजू वाईन, काजू पल्प, काजू ज्यूस, नेक्टर व काजू बोंडूच्या चोथ्यापासून जनावरे, पक्षी यांच्यासाठी खाद्य तयार केल्यास येथील ९५ टक्के काजू बोंडू वापरात येऊन त्यातून काजू उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. काजू बोंडूपासून उच्च दर्जाची उत्पादने घेण्यासाठी काढणी व हाताळणी योग्यप्रकारे केली पाहिजे, असे मार्गदर्शन ब्राझील स्थित विजय व दीपाली बावसकर दाम्पत्याने केले.
मूळ भारतीय असलेले व ब्राझील स्थित किप दी बॅल रोलिग तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे संस्थापक असलेल्या बावसकर दाम्पत्याने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिली. येथील फळ संशोधन केंद्रात असलेल्या चार प्रयोगशाळा या ब्राझील येथे असलेल्या प्रयोगशाळांच्या तोडीच्या आहेत. त्याचा उपयोग काजू उत्पादक शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे, असे आवाहन यावेळी बावसकर यांनी केले. कोकणातील वाया जाणारा काजू बोंडू ब्राझीलच्या धर्तीवर उपयोगात आणण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात येथील शास्त्रज्ञ, काजू कारखानदार व काजू उत्पादक यांच्याशी चर्चा केली.
यावेळी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजन खांडेकर, उद्यानवेत्ता डॉ. महेंद्र गव्हाणकर, रोहा येथील काढणी पश्चात अभियांत्रिकी विभागाचे डॉ. श्रीकांत स्वामी, प्रा. प्रकाश रेळेकर, आंबा-काजू बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, बिपिन वरसकर, राजन पोकळे, उमेश येरम, अस्मिता एम.जे., फळ संशोधन केंद्राच्या डॉ. स्मिता देशमुख, डॉ. एम. पी. सणस, ललित खापरे, डॉ. संजय चव्हाण, ए. जी. साटेलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Wari Accident : जेजुरी अपघातातील जखमी वारकऱ्यांची सुनेत्रा पवार यांच्याकडून विचारपूस, अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

'तू मला रडवलंस...' जेनिलिया देशमुखने राम कपूर संदर्भात व्यक्त होत म्हणाली...

Vinayak Raut Case: शारीरिक छळ अन् मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी अघोरी उपचार; राऊत कुटुंबियांविरोधात सुनेची तक्रार

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Instagram यूजर्ससाठी धोक्याची घंटा! 'ही' सेटिंग बंद न केल्यास Meta AI वापरू शकतो तुमचे पर्सनल फोटो, कसं बंद करायचं पाहा

SCROLL FOR NEXT