कोकण

सांगवे अपघातात तीन गंभीर

CD

98133
98134
कनेडी ः सांगवे येथील अपघातग्रस्त वाहने.


सांगवे अपघातात तीन गंभीर

इकोची रिक्षाला धडक; वळणाचा अंदाज न आल्याने घात

कणकवली,ता. २३ ः कनेडी बाजारपेठेपासून जवळच असलेल्या सांगवे पामतेल येथील चढावावर समोरून येणाऱ्या रिक्षाला इको गाडीची धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह दोन महिला मिळून तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सायंकाळी पाचच्या सुमारास कणकवली ते नरडवे रस्त्यावर सांगवे येथे झाला. या अपघातात फोंडाघाट येथील रिक्षा चालक सचिन म्हसकर व रिक्षातील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय उपचार करून तातडीने गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथे हलविण्यात आले.
कनेडी बाजारपेठ येथून कणकवलीच्या दिशेने रिक्षा (एम.एच. ०७ सी ४२८९) कणकवलीकडे जात होती. रिक्षामध्ये फोंडाघाट येथील दोन महिला व अन्य एक प्रवासी होता. कनेडी बाजारपेठेपासून काही अंतरावर सांगवे पामतेल येथील उतारावर आले. तिव्र वळाणाचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या इको मोटारीची रिक्षाला धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.
--
स्थानिकांकडून जखमींना तातडीने मदत
अपघातग्रस्त मोटार ही ठाणे येथून नरडवे येथे गावी येणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांची असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याबाबत उशिरापर्यंत पोलिसांत कुठलीही नोंद नव्हती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी कनेडी परिसरातील अनेक तरुण गोळा झाले होते. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी ‘गोमेकॉ’त हलविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT