कोकण

ःसती विद्यालयातील चार शिक्षकांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

CD

३७ (पान २ साठी)


- ratcl२८४.jpg ः
९९२०३
चिपळूण ः सेवानिवृत्त कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार शेखर निकम.
---

सती विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार

चिपळूण, ता. २९ ः सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सती चिंचघरी येथील सेवानिवृत्त होणारे चारही कर्मचारी संस्थेच्यादृष्टीने अतिशय योगदान देणारे आहेत. शाळेची शिस्त, कामातील प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे हे शिक्षक आहेत. खेर्डी हायस्कूलच्या पायाभरणी आणि उभारणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे योगदान सह्याद्री शिक्षणसंस्था कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी सती चिंचघरी येथे केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी-सती चिंचघरी विद्यालयात सहाय्यक शिक्षक भाग्यश्री मोघे, कृष्णत थोरात, जयसिंग कुंभार व रमाताई रकटे हे सेवानिवृत्त झाले. या चौघांचाही आमदार निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक संजय वरेकर यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त होणाऱ्या चारही कर्मचाऱ्यांनी शाळेचे अतिशय उत्तम पद्धतीने प्रामाणिकपणे काम केल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आभार मानत विद्यालयास काही भेटवस्तू दिल्या. विज्ञानशिक्षक शिवाजी पाटील यांनी चारही सत्कारमूर्तींबाबत स्वरचित कवितेचे वाचन केले. या वेळी स्कूल कमिटीचे सदस्य राजाभाऊ चाळके, निवास थोरात, महेश चाळके, रमेश चाळके, उपमुख्याध्यापक अमर भाट, पर्यवेक्षक पांडुरंग काळुगडे, पर्यवेक्षिका असावरी राजेशिर्के, राजेंद्र पवार, कलाशिक्षक तुकाराम पाटील आदींसह शिक्षक परिवार व सेवानिवृत्तांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT