कोकण

दोडामार्ग ठाण्यास महानिरीक्षकांची भेट

CD

दोडामार्ग ठाण्यास महानिरीक्षकांची भेट
दोडामार्ग ः कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी शुक्रवारी येथील पोलिस ठाण्याला भेट दिली. येथील सीमा तपासणी नाक्यांची पाहणी करत त्यांनी आढावा घेतला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शिवाय गोवा राज्यही लगत असल्याने कर्नाटकात अवैध मार्गाने दारू तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोकड अथवा अन्य साहित्याची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने तालुक्यात खोक्रल, वीजघर, दोडामार्ग, आयी अशा चार ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी सर्व तपासणी नाक्यांची पाहणी करून पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकाऱ्यांना घ्यायची खबरदारी व कारवाईबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.
---
किल्ले रामगडवर उद्या दीपोत्सव
मालवण ः महाराष्ट्र दुर्गवीर प्रतिष्ठान आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी (ता. १) किल्ले रामगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊला रामगड बाजारपेठ ते रामगड किल्ला पालखी मिरवणूक, साडेदहाला गडपूजन, गणेश पूजन, छत्रपती शिवाजी महाराज पूजन, सायंकाळी सहाला शिवकाळाची अनुभूती करून देणारा दीपोत्सव आणि मशालोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत.
----------------
नेरुरला मंगळवारी धार्मिक कार्यक्रम
नेरुर ः नेरुर-वाघोसेवाडी येथील सिद्धपुरुष मित्रमंडळातर्फे मंगळवारी (ता. २) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त श्रींची महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी चारला भजने, सहाला सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री नऊला सिद्धेश्वर दशावतार मंडळ, दोडामार्ग यांचे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजांनी केले आहे.
-----------------
मालवणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
मालवण ः राजकोट बॉईज क्रिकेट संघ व राजकोट मित्रमंडळ आयोजित प्रकाशझोतातील कृष्णा बापू भाबल स्मृती चषक बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा ९ ते १३ मे दरम्यान राजकोट मेढा येथे आयोजित केली आहे. विजेत्या संघाला ५१ हजार, उपविजेत्या संघाला २५ हजार, उपांत्य फेरीतील पराभूत संघांना ५,५५५ रुपये व प्रत्येकी चषक व अन्य वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी प्रसाद यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT