कोकण

सीमा भागात सतर्कता बाळगा

CD

99309
सावंतवाडी ः येथील पोलिस ठाण्यात पदक प्राप्त पोलिस कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी.

सीमा भागात सतर्कता बाळगा

प्रवीण पवार; सावंतवाडीत पदक प्राप्त पोलिसांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सीमेवर असून त्यामुळे दक्ष राहिले पाहिजे. दारू वाहतुकीवर कडक कारवाई करतानाच अन्य हालचालींवरही लक्ष ठेवा, अशा सूचना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी केल्या.
पोलिस सेवेत असताना उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व दहा पोलिस हवालदारांसह बारा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. त्यापैकी काही जणांचा कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला. पोलिस सेवेत असताना प्रामाणिक आणि खडतर काम करून आपला तसेच पोलिस खात्याचा गौरव या सर्वांनी वाढविला आहे. आपल्या कामातून पोलिस विभागात ठसा उमटवला आहे. त्यांचे पोलिस सेवेतील कार्य प्रशंसनीय आहे. अशी कामगिरी पोलिस विभागातील अन्य कर्मचाऱ्यांनीही बजावली पाहिजे, असे आवाहन यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक पवार यांनी केले. यावेळी पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व विभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर रोहिणी साळुंखे उपस्थित होत्या. क्राईम ब्रँच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक सतीश कविटकर, क्राईम ब्रँच हवालदार रुपाली खानोलकर, जिल्हा पोलिस शाखेच्या तपस्या चव्हाण, सीआयडी हवालदार गोविंद तेली, मोटार परिवहन शाखा हवालदार भालचंद्र दाभोलकर, महेश घाडीगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पवार यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, पदक प्राप्त सर्व बारा कर्मचाऱ्यांना १ मे रोजी महाराष्ट्रदिनी ओरोस येथे गौरविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT