कोकण

खेर्डीत 7 मे ला रंगणार कुस्तीचा महासंग्राम

CD

.८ (पान ६ साठी)

खेर्डीत रंगणार कुस्तीचा महासंग्राम

ठाकरे शिवसेना ; ७ मे रोजी पहिल्या कोकण केसरी स्पर्धेचे आयोजन

चिपळूण, ता. २९ ः पश्चिम महाराष्ट्रातील मर्दानी खेळ असलेल्या कुस्तीचा महासंग्राम चक्क कोकणच्या लाल मातीत रंगणार आहे. शिवसेना युवासेना खेर्डी विभाग आणि आदर्श क्रीडा व सामाजिक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली कोकण केसरी कुस्ती स्पर्धा ७ मे रोजी होणार आहे. या स्पर्धेत राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा गाजवणारे शंभरहून अधिक पैलवान खेर्डीच्या आठवडा बाजार येथील मैदानात शड्डू ठोकणार आहेत.
कुस्ती म्हटलं की, सर्वसाधारणपणे पश्चिम महाराष्ट्र आणि येथील वेगवेगळ्या आखाड्यातील पिळदार शरीरयष्टीचे पैलवान चटकन नजरेसमोर येतात. खांद्यावर विजेतेपदाच्या मानाची गदा घेतलेले पैलवान तर आजच्या तरुणाईचे आकर्षण ठरत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील याच कुस्तीचा कोकणातही प्रसार व्हावा, कोकणच्या मातीतूनही पैलवान तयार व्हावेत या हेतूने शिवसेना (ठाकरे गट) युवासेना खेर्डी विभाग आणि आदर्श क्रीडा व सामाजिक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ७ मे रोजी सायं. ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत विद्युत प्रकाशझोतात स्पर्धा खेळवली जाणार आहे.
स्पर्धेत मानाच्या कुस्त्यांसह जवळपास ६० कुस्त्या क्रीडारसिकांना पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख, महाराष्ट्र उपकेसरी पै. प्रकाश बनकर, महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे, मुंबई महापौर केसरी पै. भारत मदने यांच्यासह पैलवान सुदेश ठाकूर, अरूण बोंगडे, दिग्विजय जाधव, प्रदीप ठाकूर या खुल्या गटातील पैलवांनारोबर लहान कुस्तीचा किंग निखिल माने, विराज राजमाने असे कुस्तीमधील अनेक स्टार पैलवान या स्पर्धेसाठी सज्ज आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते होणार असून, आमदार राजन साळवी, शेखर निकम, संजयराव कदम, जिल्हाप्रमुख सचिन कदम, प्रताप शिंदे आदींसह तालुकाप्रमुख विनोद झगडे, संदीप सावंत उपस्थित राहणार आहेत. पारितोषिक वितरण खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते होईल. या वेळी आमदार सुनील शिंदे, वैभव नाईक यांच्यासह जिल्हाप्रमुख विलास चाळके, बाळा कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चिपळूणसह कोकणातील क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्पर्धा संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Latest Marathi News Live Update : नवजात बाळाचा मृत्यूनंतर काही दिवसांतच मातेचाही मृत्यू

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

SCROLL FOR NEXT