कोकण

इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाची नॅक मुल्यांकनमध्ये भरारी

CD

१६ (पान २ साठी)

इंदिरा इन्स्टिट्यूटची नॅक मुल्यांकनमध्ये भरारी

साडवली, ता. २९ ः प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित साडवलीतील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद म्हणजेच नॅकद्वारे घेण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीत B++ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. मुंबई विद्यापिठाशी संलग्नित असणाऱ्या या महाविद्यालयाने २०१७ ला मुल्यांकनाच्या पहिल्या फेरीत २.०९ CGPA गुण मिळवत B श्रेणी मिळवत नॅक मूल्यांकन असणारं कोकणातील पहिलं फार्मसी महाविद्यालय होण्याचा बहुमान मिळवला होता. त्यानंतर गेली ५ वर्षे दर्जेदार शिक्षणावर भर देत दुसऱ्या फेरीसाठी पुनर्मुल्यांकन केले.
नॅकद्वारे नियुक्त केलेल्या तीन तज्ञ आणि प्रतिष्ठित मुल्यांकनकर्त्यांचा समावेश असलेल्या निरीक्षण समितीने महाविद्यालयास भेट दिली. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयातील अभ्यासक्रम, अध्यापन दर्जा, केले जाणारे संशोधन, नावीन्यपूर्ण शिक्षण, राबवले जाणारे समाजोपयोगी उपक्रम, महाविद्यालयाचे दूरदृष्टिकोन आणि भविष्यातील धोरण, शिक्षकांचा दर्जा, मूलभूत सोईसुविधा इत्यादींच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, १०० टक्के घेतला जाणार अभासक्रम, सुसज्ज ग्रंथालय, दिली जाणारी प्लेसमेंट तसेच इतर गोष्टींबरोबरच औद्योगिक क्षेत्राशी असणारे महाविद्यालयाचे संबंध, दिल्या जाणाऱ्या सुविधा याबद्दल मूल्यांकनकर्त्यांकडून विशेष प्रशंसा मिळवली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनी संस्थाध्यक्ष रवींद्र माने आणि संस्था पदाधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT