कोकण

तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जखमी

CD

99426
आंबेली ः अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.
99427
आंबेली ः मोटारीचे झालेले नुकसान. (छायाचित्र ः संदेश देसाई)


तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जखमी

आंबेलीत घटना; मोटारीला धडकून दुचाकी ट्रकखाली

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २९ ः तिलारी राज्यमार्गावर आंबेली येथील वळणावर आज तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. त्याच्यावर गोव्यात उपचार सुरू आहेत. मोटारीने ठोकर देताच समोरून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली दुचाकी सापडली. वेगात असलेल्या मोटारीमुळे हा अपघात झाल्याची फिर्याद ट्रक चालकाने पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार मोटार चालकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. हा अपघात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला.
याबाबत ट्रक चालकाने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रकमधून सिमेंटचे मोठे पाईप घेऊन कुडाळ येथून दोडामार्ग मार्गे मोर्लेच्या दिशेने चालक जात होता. आंबेली येथे नाईक मंगल कार्यालयानजीक एक दुचाकीस्वार ट्रकला बाजू देऊन भेडशीच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या वाहनाच्या मागच्या बाजूने येणाऱ्या मोटारीने वळणावर बाजू घेऊन मोटार चालक विरुद्ध दिशेला आला; मात्र ट्रकच्या समोर असलेल्या दुचाकीस्वाराला धडक दिली. धडक बसताच दुचाकीस्वार वाहकाच्या बाजूकडील चाकाकडे येऊन कोसळला. तर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली. प्रसंगावधान राखत ट्रक जागीच उभा केल्याने अनर्थ टळला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. मोटारचालक वेगात असल्याने हा अपघात घडला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मोटारचालकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT