कोकण

मसुरे-मर्डेत ३२ लाखांची कामे

CD

99608
मसुरे मर्डे ः येथील विविध विकासकामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आली.

मसुरे-मर्डेत ३२ लाखांची कामे

ठाकरे शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे विकास; आमदार नाईकांच्या उपस्थितीत भूमिपूजने

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : मसुरे-मर्डे (ता.मालवण) ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आल्यानंतर विकासकामांचा धडाका सुरू आहे. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीत सुमारे ३२ लाख रुपयांच्या विविध विकासकामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक, स्थानिक लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आली.
आमदार नाईक यांच्या माध्यमातून मसुरे-मर्डे ग्रामपंचायत हद्दीतील मसुरे-चांदेर ब्राह्मणदेव मंदिर रस्त्यासाठी ५ लाख, मर्डे कावातर ते हुऱ्हास रस्त्यासाठी ७ लाख, मर्डे गिरकरवाडी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी १० लाख, मसुरे, मसदे, विरण, रस्त्यावर उनताटवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ लाख, मर्डे खाजणवाडी ते सावरजुवा रस्त्यासाठी ५ लाख रुपये ही कामे मंजूर केली आहेत. या कामांची भूमिपूजने आमदार नाईक यांच्या उपस्थितीत गावातील लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. गेली काही वर्षे ही कामे प्रलंबित होती. आमदार नाईक यांनी प्रलंबित विकासकामे मंजूर करण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार नाईक यांचे आभार मानले. यावेळी सरपंच संदीप हडकर, उपसरपंच पिंटू गावकर, राजा कोरगावकर, जगदीश चव्हाण, रामराज सावंत, राघवेंद्र मुळीक, पंढरीनाथ मसूरकर, जीवन मुणगेकर, साबाजी हडकर, दीपक कातणकर, अरुण गिरकर, समीर वस्त, विष्णू गिरकर, आशिष खोत, संजय पेडणेकर, मनीषा वस्त, सान्वी हडकर, यशस्वी कातणकर, जान्हवी गिरकर, नरेन हिनळेकर, तुळशीदास पेडणेकर, कृष्णा पाटील, समीर पेडणेकर, अशोक भोगले, तात्या मुळीक, राजा मुळीक आदींसह मर्डे व चांदेर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT