कोकण

चिपळूण ः आधार कार्ड असेल तरच मिळेल वाळू

CD

आधार कार्ड असेल तरच मिळेल वाळू

अॅप किंवा सेतू केंद्रात नोंदणी आवश्यक ; वाळू उपसासाठी तीन ठिकाणे निश्चित

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ः राज्य सरकारने आपले बहुप्रतीक्षित वाळू धोरण जाहीर केले आहे. यामध्ये आता ग्राहकांना वाळूखरेदीसाठी महाखनिज ॲप किंवा सेतू केंद्रात नोंदणी करून संबंधित डेपोधारकास आधार क्रमांक देणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय वाळू मिळणार नाही, असे नव्या वाळू धोरणात स्पष्ट केले आहे.
याबाबत माहिती देताना नायब तहसीलदार तानाजी शोजाळ म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वाळूचे डेपो तयार केले जाणार आहेत. वाळू उपसा आणि डेपोसाठी तीस ठिकाणे निश्चित केले आहेत. राज्य सरकारच्या नव्या धोरणानूसार आता वाळू विक्री करावी लागणार आहे. नव्या धोरणानूसार एका वेळेस एका कुटुंबास ५० मेट्रिक टनच वाळू मिळणार आहे. तीसुद्धा १५ दिवसांच्या आत उचलून नेणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास मुदतवाढीसाठी संबंधित तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागणार आहे. वाळूची तस्करी रोखण्यासाठी ही खबरदारी घेतली आहे. दरम्यान, वजन करून मेट्रिक टनांतच वाळूची विक्री करणे बंधनकारक केले आहे. वजन काटा महाखनिजप्रणालीला ऑनलाईन जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. नदीपात्राचातील वाळूथराची जाडी निश्चित बेंच मार्कच्या खाली येऊ नये. तसेच आजूबाजूच्या विहिरीतील पाण्याची पातळी घटणार नाही याची दक्षता निविदाधारकालाच घ्यावी लागेल. तसेच उत्खननासाठी ग्रामसभेची परवानगी बंधनकारक असेल.
वाळू डेपोच्या ठिकाणी तसेच गावातील ज्या मार्गावरून वाळूची वाहने ये-जा करतील, त्या मार्गांवर २४ तास सीसीटीव्ही चालू असणे आवश्यक आहे. याचा खर्च निविदाधारकाने स्वत: करायचा आहे. नदी, खाडीपात्रातून डेपोपर्यत वाळू, रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना पिवळा रंग देणे बंधनकारक केले आहे. वाहनांना जीपीएस यंत्रणा सक्तीची असेल. उत्खनन करताना खासगी मालमत्तेस नुकसान पोहचणार नाही याची जबाबदारी निविदाधारकाची असेल. नुकसानीची पाहणी करून त्यासाठीची वसूली अधिकारी करतील. सार्वजनिक पाणवठे,पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणांपासून १०० मीटर दूर अंतरानंतर वाळूचे उत्खनन करता येईल. रेल्वेपूल व रस्ते पुलाच्या कोणत्याही बाजूने ६०० मीटर्स (२००० फूट) अंतराच्या आत वाळूचे उत्खनन करता येणार नाही. सकाळी ६ ते सायंकाळी ६ यावेळेतच वाळू उत्खननास परवानगी असेल. नदीपात्रातून तीन मीटर खोलीपर्यंत वाळूचे उत्खनन करता येणार नाही. असे नव्या वाळू धोरणात स्पष्ट केले आहे.

चौकट
प्रधानमंत्री आवासला मोफत वाळू
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी सक्षम प्राधिकारी यांनी सादर केलेली यादी संबंधित तहसीलदार यांनी तपासून तशी लेखी परवानगी दिल्यानंतर वाळू डेपोतून विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यास करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT