कोकण

दिगवळे रांजणवाडी रस्त्याची दुरवस्था

CD

99911
दिगवळे ः येथील रांजणवाडी येथील चढावावरील रस्त्याची झालेली दुरवस्था. (छायाचित्र ः तुषार सावंत)

दिगवळे रांजणवाडी रस्त्याची दुरवस्था
कनेडी,ता. २ ः दिगवळे रांजणवाडी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरून धावणारी एसटी बससेवा बंद होण्याची शक्यता आहे. या समस्येती दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
कणकवली शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर दिगवळे रांजनवाडी आहे. यावासाठी सकाळी ७.४०, दुपारी ११.४५, दुपारी ३.४० आणि सायंकाळी ६.१५ ला एसटी बससेवा आहे; मात्र, रस्ता नादुरूस्त असल्याने या गावासाठी धावणाऱ्या एसटी बससेवा बंद होण्याची शक्यता आहे. या गावासाठी कणकवली ते नरडवे या रस्त्यावरून लोंढा ते रांजणवाडी असा ८ किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावरील गावडेवाडी पासून रांजणवाडी पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे गावातील नदीच्या पुलावरून असलेल्या चढावरील रस्ता पूर्णता नादुरुस्त झाला आहे. रस्त्यावरील खडी वाहून गेली आहे. एसटी बसही या चढावर चढत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे रांजणवाडी गावाकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी, अशी मागणी माजी सरपंच हरिचंद्र परब यांनी केली आहे. गावडेवाडी या भागात काही ठिकाणी रस्त्याची डागडुजी सुरू आहे; मात्र, हे काम गेले काही महिन्यांपासून अर्धवट आहे. या रस्त्यावरून चारचाकी, दुचाकी चालवणेही अवघड बनले आहे, अशीही खंत स्थानिकांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT