कोकण

खेडमधील पाणीटंचाई निवारण्यासाठी महाराष्ट्र कॉलेज सरसावले!

CD

१३ (टूडे ४ साठी, अॅंकर)

काही सुखद---------लोगो

खेडमधील टंचाई निवारण्यासाठी महाराष्ट्र कॉलेज सरसावले

जल फाउंडेशनचा पुढाकार ः निधी संकलनातून चार बोरवेल खोदल्या

खेड, ता. २ ः तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सध्या पाणीटंचाई भेडसावत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मुंबईतील महाराष्ट्र कॉलेजमधील कर्मचारी व विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. त्यांना सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले व जल फाउंडेशन या संस्थांनी टंचाईच्या तीव्रतेची जाणीव करून दिली होती. यामधूनच निधी संकलन करण्यात आले. त्यामधून खेडमध्ये चार ठिकाणी बोरवेल खोदण्यात आल्या असून, आणखी दोन ठिकाणी बोरवेल खोदण्यात येणार आहेत.
खेड तालुक्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी शासनासोबत जल फाउंडेशन ही संस्था प्रयत्नशील आहे. या संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुंबाड भोईवाडी येथील पाण्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र कॉलेज मुंबई येथील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आर्थिक साहाय्य केले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले आणि जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई दूर करण्यासाठी काम सुरू आहे. खाडीपट्ट्यातील पन्हाळजे विभागात असलेला तुंबाड भोईवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांना भेडसावणारी पाण्याची समस्या समाजसेवक खालिद चौगुले यांच्या कानावर घातली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी हा विषय मुंबईतील महाराष्ट्र कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सिराज चौगुले यांना सांगितला. प्रा. चौगुले आणि कॉलेजमधील सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी या उपक्रमासाठी निधी गोळा करण्याचे आवाहन केले. त्यानंतर काही वेळातच निधी जमा झाला आणि या कॉलेजतर्फे एकूण ६ ठिकाणी पाणीटंचाई सोडवण्यासाठी काम सुरू होत आहे. चार ठिकाणी आतापर्यंत बोरवेल खोदून पाणी ग्रामस्थांना देण्यात आले आहे. दोन ठिकाणी आगामी काळात काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिली.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

Uttarakhand: बद्रीनाथमध्ये हंगामातील पहिला स्नोफॉल; आदि कैलाश यात्रा रोखली, दरडी कोसळल्याने रस्ते ठप्प

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

SCROLL FOR NEXT