कोकण

सक्तीचे भूसंपादनाचे विरोधातील उपोषण स्थगित

CD

२६ (टुडे पान २ साठी)


-rat२p१६.jpg ः
९९९२४
मंडणगड ः जिल्हा उद्योगकेंद्राचे अधिकारी यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्ते राजकुमार निगुडकर यांच्यासह शेतकऱ्यांनी उपोषण तत्पुरते मागे घेतले.
---
सक्तीच्या भूसंपादनाविरोधातील उपोषण स्थगित

शिरगाव येथील शेतकऱ्यांची मागणी ; जिल्हा उद्योगकेंद्राची मध्यस्थी

मंडणगड, ता. २ ः सोवेली पंचक्रोशी सहकारी औद्योगिक वसाहतीकरिता मौजे शिरगाव येथील शेतकऱ्यांच्या सक्तीने भूसंपादित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात, या मागणीसाठी शिरगाव येथील शेतकऱ्यांनी केलेले आमरण उपोषण रत्नागिरी उद्योगकेंद्राच्या अधिकारी यांच्या कार्यवाहीच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
माजी सभापती राजकुमार निगुडकर व चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड तहसील कार्यालयसमोर उपोषणास बसले होते. रत्नागिरीचे जिल्हा उद्योगकेंद्राचे व्यवस्थापक एच. एम आंधळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून या विषयासंदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या विषयासंदर्भात मुख्यमंत्री यांना १७ एप्रिलला निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानुसार १ मे रोजी शिरगाव येथील महिला व पुरुष ग्रामस्थ मे महिन्याच्या उन्हातही उपोषणास बसले होते. दरम्यान, जिल्हा उद्योगकेंद्र रत्नागिरीचे व्यवस्थापक आंधळे यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमेवत मंडणगड येथे आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन देण्यात आले. जिल्हा उद्योगकेंद्राच्या वतीने तसे पत्र राजकुमार निगुडकर यांना देण्यात आले आहे. निगुडकर, चंद्रकांत दळवी यांच्यासह जयवंती शिगवण, अनिल दळवी, विनोद निगुडकर, वसंत निगुडकर, दत्तात्रय दळवी, पांडुरंग दळवी, नंदकुमार दळवी, काशीराम शिगवण, कस्तुरी दळवी, मनाली दळवी, मनोहर दळवी, सुनील दळवी, उज्ज्वला दळवी आदी ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले होते. या वेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर, किशोर दळवी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT