कोकण

रत्नागिरी-काजरघाटीतील पऱ्या होणार गाळमुक्त

CD

rat2p28.jpg-
99948
रत्नागिरीः पोमेंडी खुर्द येथील पऱ्यातील गाळ उपशाचा प्रारंभ करताना सरपंच श्रीमती भाभी पिलणकर. शेजारी प्रकाश जाधव, सुयश पिलणकर, चित्तरंजन पिलणकर, प्रसाद शिंदे आदी.
-------------
काजरघाटीतील पऱ्या होणार गाळमुक्त
कामाचा प्रारंभ; पालकमंत्र्यांनी दिला निधी
रत्नागिरी, ता. २ः पोमेंडी खुर्द-काजरघाटी येथील पऱ्या गाळाने भरल्याने पावसाळ्यात पुराच्या कालावधीत घरात आणि शेतजमिनीत पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या पऱ्यातील गाळ उपशाची मागणी होती. त्याप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांनी गाळ उपशासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने गाळ उपशाच्या कामाला सुरवात झाली आहे.
महाराष्ट्र शासन व नाम फाउंडेशन यांच्यावतीने हे काम सुरू झाले आहे. याचा प्रारंभ सरपंच भाभी पिलणकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपसरपंच प्रकाश जाधव, ग्रामसेवक ठीक, ग्रामस्थ दिलीप पटवर्धन, सुयश पिलणकर, राजा पटवर्धन, तुषार पवार, श्री. नार्वेकर, बाळा पिलणकर, चित्तरंजन पिलणकर, प्रसाद शिंदे आदी उपस्थित होते. गाळ उपशामुळे येथील पात्र खोल होऊन पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विहिरींची पाणी पातळीही वाढण्यास मदत होणार असल्याने येथील ग्रामस्थांनी या कामाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, या कामामध्ये लोक सहभाग महत्वाचा असून मशीन ऑपरेटर यांची राहण्याची सोय ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या भोजनाचा खर्च ग्रामस्थांनी, शेतकरी यांनी सामूहिकरित्या करायचा आहे. त्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आर्थिक स्वरूपात किंवा जिन्नस स्वरूपात आवश्यक आहे. त्यासाठी उपसरपंच प्रकाश जाधव यांच्याकडे संपर्क साधावा आणि वस्तुरूप किंवा आर्थिक मदत करावी, असे आवाहनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT