कोकण

मार्चच्या पेन्शनसाठी सिंधुदुर्गनगरीत ‘घंटानाद’

CD

00045
सिंधुदुर्गनगरी ः मार्चची पेन्शन मिळण्याबाबत रावजी यादव यांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले आहे.

मार्चच्या पेन्शनसाठी
सिंधुदुर्गनगरीत ‘घंटानाद’

निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः मे उजाडला तरी निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याची पेन्शन मिळाली नसल्याने माजी सहाय्यक प्रशासन अधिकारी रावजी यादव यांनी आजपासून जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र शासनाने शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, शासन अनुदानित संस्थांमधून नियमित वयोमानानुसार निवृत्त झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवेचा मोबदला म्हणून दरमहा देय असलेली पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देऊन बरीच वर्षे झाली. मार्चची पेंशन एप्रिलमध्ये जमा होणे आवश्यक असताना मे उजाडला तरी पेन्शन जमा झाली नाही. याबाबत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी (कुडाळ) आणि पोलिसांना २० एप्रिलला निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले होते; परंतु त्याची घेतली नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज यादव यांनी जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन सुरू केले. महिन्याच्या १ तारखेला पेन्शन जमा व्हावी; अन्यथा त्या महिन्याच्या २ तारीखपासून पेन्शन जमा होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन केले जाईल, असा इशारा यादव यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : मनोज जरांगे मुंबईला निघताच समर्थक अन् नागरिकांची गर्दी

‘शरीरसंबंधाला नकार दिला तर मालिकेतून काढतात’; अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ, ७० हजारांच्या भाड्याचंही केलं भाष्य

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

SCROLL FOR NEXT