कोकण

‘शलाका’मधून विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव

CD

टीपः swt२३६.jpg मध्ये फोटो आहे.
मालवण ः येथील भंडारी हायस्कूलच्या ‘शलाका’ वार्षिकांकाचे प्रकाशन करताना अभिनेत्री तारका पेडणेकर. शेजारी मुख्याध्यापक वामन खोत, प्रफुल्ल देसाई, आर. डी. बनसोडे, दादा वेंगुर्लेकर, संजना सारंग, सुनंदा वराडकर आदी.

‘शलाका’मधून विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव

तारका पेडणेकर; मालवणात वार्षिकांकाचे प्रकाशन

मालवण, ता. २ : विद्यार्थ्यांच्या साहित्यिक कलागुणांना वाव मिळावा म्हणून भंडारी हायस्कूलने सुरू केलेला ‘शलाका’ वार्षिकांकाचा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमातून उद्याचे साहित्यिक निर्माण होतील, असे प्रतिपादन अभिनेत्री तारका पेडणेकर यांनी येथे केले.
येथील भंडारी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांच्या साहित्याचा अंतर्भाव असणाऱ्या ‘शलाका’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन अभिनेत्री तारका पेडणेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक वामन खोत, सहाय्यक शिक्षक आर. डी. बनसोडे, मातृत्व आधार फाउंडेशनचे संचालक दादा वेंगुर्लेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, सहाय्यक शिक्षिका संजना सारंग, सुनंदा वराडकर, ज्योती आदी उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक वामन खोत यांनी स्वागत केले. प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले.
अभिनेत्री पेडणेकर म्हणाल्या, ‘‘भंडारी हायस्कूलने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मी ज्या शाळेत होते, त्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे; परंतु विद्यार्थ्यांच्या कलेला, त्यांच्यातील साहित्यिकाला वाव मिळावा, यासाठी भंडारी हायस्कूल हा जो उपक्रम राबवत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये कितीतरी लेखक, कवी, अभिनेते दडलेले असतात; मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन, व्यासपीठ मिळत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये खूप सारे प्लॅटफॉर्म उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्या गावाच्या ठिकाणी तुमची शाळा हे उपक्रम राबवून एक व्यासपीठ निर्माण करते, ही बाब कौतुकास्पद आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या कला क्षेत्रात आज नावाजलेले आहेत आणि या सगळ्याचे श्रेय हे शाळेचे आणि इथल्या गुरुजनांचे आहे. आई वडील आपल्यावर ज्याप्रमाणे संस्कार करतात त्याचप्रमाणे शाळा, आपले शिक्षक यांचा देखील यामध्ये मोलाचा वाटा असतो म्हणून विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण न विसरता जीवनाचा मार्ग चोखाळावा असे आवाहन पेडणेकर यांनी केले. यावेळी तारका पेडणेकर यांचा मुख्याध्यापक वामन खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT