कोकण

सिंधुदुर्गाशी जुळलेले ऋणानुबंध जपा

CD

00201
कुडाळ ः अन्य जिल्ह्यांतील शिक्षकांना निरोप देताना बीडीओ विजय चव्हाण. शेजारी इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)

सिंधुदुर्गाशी जुळलेले ऋणानुबंध जपा

विजय चव्हाण; कुडाळमध्ये परजिल्ह्यांतील शिक्षकांना निरोप

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः शिक्षकी पेशा सांभाळताना तुम्ही विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार जिल्हा विसरणार नाही. आता आपल्या गावी परतण्याच्या आनंदासह सिंधुदुर्गाचे पर्यटन, संस्कारही दूरवर पोचवा, असे प्रतिपादन कुडाळ पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केले.
तालुक्यात गेली कित्येक वर्षे शिक्षक सेवा बजावलेल्या चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, बीड, सांगली, ठाणे आदी जिल्ह्यांतील ६३ शिक्षकांना आज येथील पंचायत समितीच्या सभागृहात निरोप देण्याचा कार्यक्रम गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, मुकेश सजगाने, शिक्षक नेते केटी चव्हाण, धोंडी रेडकर, उदय शिरोडकर, स्वामी सावंत, नंदकुमार राणे, प्रसाद वारंग, राजा कविटकर आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी चव्हाण म्हणाले, ‘‘अन्य जिल्ह्यांतील शिक्षकांनी गेली बरीच वर्षे जिल्ह्यात ज्ञानदानाचे काम केले. जिल्ह्यात दीर्घ सेवा बजावल्यानंतर आपल्या गावी जात आहेत. बाहेर बरीच वर्षे काम केल्यानंतर आपल्या घरी जाण्याची प्रत्येकाला ओढ असणे हे साहजीकच आहे. ती ओढ या निमित्ताने दिसून आली. शिक्षकी पेशा करताना तुमचे योगदान अनन्यसाधारण असे आहे. तुम्ही विद्यार्थी घडविले, त्यांच्या जीवनाला दिशा दिली. तुमच्या जिल्ह्यात गेल्यानंतर येथील आठवणी जपा. वर्षातून किमान एकदा तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी या आणि येथील पर्यटन सर्वदूर पोचवा. या जिल्ह्याशी जुळलेले ऋणानुबंध कायम जपा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT