उन्हाळी हंगामासाठी
जादा रेल्वे धावणार
कणकवली, ता. ४ः कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी उन्हाळी हंगाममध्ये अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक (टी) ते थिविम या मार्गावर ही जादा गाडी धावणार आहे.
गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) ते थिविम स्पेशल (त्रि-साप्ताहिक) लोकमान्य टिळक (टी) येथून दर शनिवार, सोमवार आणि बुधवार ६, ८ आणि १० रोजी रात्री १०. १५ वाजता सुटेल. तसेच ५, १३, १५, १७, २०, २२,२४,२७,२९, ३१ मे आणि ३ जून रोजी ही धावणार आहे. परतीसाठी गाडी क्रमांक ०११३० थिविम ते लोकमान्य टिळक (टी) विशेष (त्रि-साप्ताहिक) थिविम येथून दर रविवार, मंगळवार आणि गुरुवार ७ मे ते ४ जून रोजी सायंकाळी ४.४द वाजाता थिविम येथून निघेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल.गाड्यांचे बुकिंग ४ मेपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली, काउंटर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.