कोकण

शिक्षणमंत्र्यांकडून बेरोजगारांच्या जखमेवर मीठ

CD

swt४१४.jpg
००४९२
विजय फाले

शिक्षणमंत्र्यांकडून बेरोजगारांच्या जखमेवर मीठ
डीएड संघटनाः कमी पटसंख्येच्या शाळेत सेवानिवृत्तांना नेमण्याचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ४ः शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होत असतानाच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हा डीएड बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्यासाठी कायदा होत असेल तर बेरोजगारांसाठी का नाही? असा सवाल सिंधुदुर्ग डीएड बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष विजय फाले यांनी पत्रकातून केला आहे. जिल्ह्यातील स्थानिक डीएड बेरोजगारांना सरसकट डीएड पदविका मेरीटवरच शिक्षक म्हणून सामावून घ्यावे, अशी मागणीही त्यांनी यात नमूद केली आहे.
प्रसिध्दी पत्रकात श्री. फाले यांनी म्हटले आहे की, शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होत असतानाच शिक्षणमंत्री केसरकर यांनी वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मुळातच आज दहा वर्षे शिक्षक भरती न झाल्यामुळे स्थानिक डीएड धारक बेरोजगार झाले आहेत. ही पदवी या क्षेत्राखेरीज अन्य कुठेही उपयोगात नाही. त्यातच टीईटीच्या माध्यमातून समोर आलेले भ्रष्टाचार, tait परीक्षेतील समोर आलेला घोळ यामुळे डीएड बेरोजगार पुरता संपला आहे. गुणवत्ता असतानाही ती पुन्हा पुन्हा तपासली जात आहे. निवृत्त शिक्षकांना परत सेवेत घेणे कितपत योग्य आहे? बेरोजगारांना शिकून तब्बल दहा वर्ष होऊन सुद्धा शिक्षक म्हणून भरती अथवा एखाद्या शाळेतही नोकरीला लागलेले नाहीत. किंबहुना वयोमर्यादा संपून जाण्याच्या मार्गावर ते आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत तब्बल १ हजार ११४ जागा रिक्त आहेत. पवित्र पोर्टल पद्धतीचे सूरू असलेले गोंधळ लक्षात घेता सद्यस्थितीत भरती प्रक्रिया होणे अशक्यच मानले जात आहे. परजिल्ह्यातील स्थानिक शिक्षक आजच्या घडीला कार्यमुक्त होऊन आपापल्या जिल्हयात गेले आहेत आणि आज सिंधुदुर्गातील शाळांवर संकट ओढवले आहे. जूनमध्ये शाळा सूरू होण्याअगोदर शाळेत शिक्षक रुजू होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील उमेदवारांऐवजी स्थानिक डीएड पदविकाधारक बेरोजगारांना सरसकट संधी दिली तर आजच्या घडीला बरीच वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना न्याय मिळेल. आता निवृत्त शिक्षकांना शाळेवर नियुक्त्या देण्याच्या हालचाली देखील दिसून येत आहेत. याला जिल्ह्यातील डीएड बेरोजगरांचा तीव्र विरोध आहे. यात सेवानिवृत्त शिक्षकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे श्री. फाले यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

कोट
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन स्थानिक डीएड बेरोजगारांना जिल्ह्यातच तातडीने सामावून घेऊन सरसकट भरती प्रक्रियेत न्याय मिळवून द्यावा तसे न केल्यास मोठ्या प्रकारचे आंदोलन केले जाईल.
- विजय फाले, अध्यक्ष, डीएड बेरोजगार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT