कोकण

पुलाचे काम अपूर्ण

CD

१४ (टूडे ३ साठी)

- rat५p२.jpg-
२३M००६३९
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे सातपऱ्या पूल अर्धवट स्थितीत.

- rat५p३.jpg ः
२३M००६४३
जोडरस्त्याचे काम अपूर्ण.

(छाया - स्वप्नील शिवनेकर, गावडेआंबेरे)

सातपऱ्या येथील पुलाचे काम अपूर्ण

मावळंगे-गावडेआंबेरेला जोडणारा मार्ग ; ग्रामस्थांमध्ये नाराजी

पावस, ता. ५ ः तालुक्यातील मावळंगे व गावडेआंबेरे या गावाला जोडणाऱ्या सातपऱ्या येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उंच पुलाचे काम अपूर्ण आहे. पूल आणि रस्ता जोडण्यासाठी मातीने भराव टाकण्याचे शिल्लक आहे. ते वेळेत झाले नाही तर यंदा पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होईल. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे.
गावडेआंबेरे सातपऱ्या येथे २० वर्षापूर्वी मोरी टाकून रस्ता वाहतुकीस सुरू करण्यात आला होता. कमी उंची असल्यामुळे पावसाळ्यात वारंवार पुरामुळे वाहतूक खंडित होत होती. परिणामी, या परिसरातील ग्रामस्थांना अन्य मार्गाचा अवलंब करावा लागत होता. येथे पूल व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. या पुलासाठी ८ कोटी मंजूर करण्यात आले. त्याचे कामही सुरू झाले. मागील वर्षी पुलाच्या बांधकामाला आरंभ झाला; परंतु पावसाळा सुरू झाल्यामुळे दहा टक्के काम अपूर्ण राहिले. पावसाळा संपल्यानंतर या पुलाचे काम सुरू होईल, असे वाटले होते; पण त्याचे उर्वरित काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यावर्षी पुलाचे काम पूर्ण होऊन मातीचा भराव टाकला जाईल, अशी नागरिकांना आशा होती. पुराचे पाणी दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मातीचा भराव टाकणे गरजेचे आहे. ते काम न झाल्यामुळे यावर्षी येथील नागरिक, वाहनचालकांना दरवर्षीप्रमाणे पुराचा सामना करावा लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले काम अद्याप पूर्ण होत नसल्याने परिसरात नाराजीचा सूर आहेत. मे महिना सुरू झाला असून, संबंधित ठेकेदाराने काम केले नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय निश्चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT