कोकण

ध्वजवंदन

CD

२० (संक्षिप्त, पान ५ साठी)

दापोली नगरपंचायतीत महाराष्ट्र दिनी
स्वच्छता कर्मचाऱ्यांने केले ध्वजवंदन

दाभोळ ः कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त दापोली नगरपंचायतीत करण्यात आलेल्या ध्वजवंदनाचा मान येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात आला. या वेळी स्वच्छता मुकादम असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. दापोली नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी हे दररोज शहरातील परिसर साफसफाई करून स्वच्छ ठेवत असतात. त्यामुळे १ मे रोजी कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिनाचे दिवशी होणारे ध्वजवंदन सफाई मुकादम ठेकेदार पपीन पाटील, संदीप डिंगणकर, नीलेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दापोली नगराध्यक्षा ममता मोरे, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष मोरे यांनी चांगला पायंडा पाडल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

---
दापोली-गुहागरदरम्यान फेरीबोट सेवा

दाभोळ ः दापोली येथीळ सुवर्णदुर्ग शिपिंग व मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीमार्फत दाभोळ खाडीत स्थानिक जनतेच्या या सोयीसाठी व कोकणांत पर्यटनविकास व्हावा म्हणून दापोली-गुहागर दरम्यान फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा आरंभ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुभाष जवळगीकर यांच्या हस्ते परचुरी येथे करण्यात आला. या सेवेमुळे दापोली व गुहागर तालुके जलमार्गे जोडले गेले आहेत. या वेळी बँक ऑफ इंडिया शाखा दापोलीचे व्यवस्थापक अनंत डिगे, उद्योजक राजन दळवी, डॉ. चंद्रकांत मोकल, डॉ. योगेश मोकल, सरपंच प्रतीक्षा भुवड, सत्यवान देर्देकर, सामाजिक कार्यकर्ते मधुकर मुळे, उन्हवरे, फरारे सरपंच प्रणाली पवार, उपसरपंच महेश जावळे आदी उपस्थित होते. या सेवेमुळे उन्हवरे व परचुरी पंचक्रोशीतील व्यापार व या मार्गे येणाऱ्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

---

जालगाव येथे बचतगट भवनाचे
भूमिपूजन आमदार कदमांच्या हस्ते

दाभोळ ः दापोली तालुक्यातील जालगाव येथील राणी लक्ष्मीबाई महिला प्रभाग संघ व शिवतेज आरोग्यसेवा संस्था खेड, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना, वनशास्त्र महाविद्यालय यांच्या सौजन्याने अगरबत्ती निर्मिती प्रकल्प व बचतगट भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांच्यासह महिला बचतगटाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

रस्त्याबाबत दापोली नगरपंचायतीला निवेदन

दाभोळ ः दापोली शहरातील दापोलीकडे जाणारा प्रमोद पांगारकर घर ते मौजे दापोली स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुरवस्थेबाबत दापोली येथील सामाजिक कार्यकर्ते अल्पेश भुवड यांनी दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. पांगारकर घर ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने दापोलीसह त्या पुढील गावातील लोकांना गेली काही वर्षे त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर लाकडाच्या गिरणीच्या वरील भागात इमारतींचे बांधकाम गेली काही वर्ष सुरू आहे. त्यामुळे मौजे दापोली व किरांबावासियांना उन्हाळ्यात धुळीचा तर पावसाळ्यात रस्त्यावरील चिखलाचा त्रास सहन करावा लागतो. सांडपाणीदेखील रस्त्यावर येते. या समस्या व होणारा त्रास भुवड यांनी नगरपंचायतीला दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटाराचे काम पावसाळ्याच्याआधी पूर्ण करण्यात न आल्यास रस्त्यावर साचलेली माती उचलून रस्ता साफ करून द्यावा, अन्यथा रस्त्यावरील माती व चिखल नगरपंचायत कार्यालयासमोर आणून टाकण्यात येईल, असा इशारादेखील अल्पेश भुवड यांनी दिला आहे.

---

दापोलीतील एकमेव सीएनजी भरणा केंद्र

दाभोळ ः पेट्रोल व डिझेलच्या दरात कायम वाढ होत असल्याने अनेकांनी सीएनजी अर्थात गॅसवर चालणारी वाहने घेतली आहेत; मात्र दापोली येथे सीएनजी भरणा केंद्र एकच असल्याने व पर्यटन हंगामात सीएनजी केंद्रावर वाहनाच्या रांगा लागतात. दापोलीत मोठ्या संख्येने येणारे पर्यटक सीएनजी गाड्या घेऊन येतात. दापोलीतील अनेक रिक्षा व इतर गाड्या, वाहने सीएनजीवर आहेत. स्थानिक व पर्यटक हे त्यांची सीएनजीवरील वाहने घेऊन या केंद्रात येतात. दापोलीत सध्या दाभोळ मार्गावर एकच सीएनजी भरणा केंद्र असल्याने तेथे तासनतास रांगेत उभे राहून गॅस भरावा लागतो. त्यामूळे वाहनचालकांचा वेळ फुकट जातो. दापोली तालुक्यात मंडणगड मार्गावर आणखी एका सीएनजी केंद्राचे बांधकाम सुरू झाले असून हे काम पूर्ण झाल्यावर एकाच केंद्रावर असलेला भार कमी होणार आहे.

---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT