कोकण

साळिस्तेत उद्यापासून कलशारोहण सोहळा

CD

01028
साळिस्ते ः येथील श्री देव खांबेश्वर, विठ्ठलादेवी मंदिर. (छायाचित्र : एन. पावसकर)

साळिस्तेत उद्यापासून कलशारोहण सोहळा

खांबेश्वर मंदिर जीर्णोद्धार; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

तळेरे, ता. ६ : साळिस्ते गावचे ग्रामदैवत श्री देव खांबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पुनःप्रतिष्ठापना हरिचरणगिरी येथील श्री. वेदमूर्ती गणेश जोशी यांच्या पौराहित्याखाली व कलशारोहण श्री मठ संस्थान, दाभोली येथील श्रीमत दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त ८ ते ११ मे दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सोमवारी (ता. ८) सकाळी ९ ते ते ११ प्रायश्चित विधी व रुद्र याग, दुपारी एकला महाप्रसाद, सायंकाळी चारला ढोलताश्यांच्या गजरात मिरवणुकीने देवांचे आगमन, त्यानंतर राक्षोघ्न विधी, मंगळवारी (ता. ९) सकाळी सातला मंगलाचरण, यजमान देवताना निमंत्रण महासंकल्प, दुपारी एक पर्यंत गणेशपूजनादी, नांदी श्राद्धांत पुण्याहवाचन, आचार्यदी रुत्विगवरण, आचार्यकर्म, मंडप प्रतिष्ठा, कौतुकबंध, शांती होम, गंगापूजन, जलाधिवास, स्नानविधी, कार्य समाप्ती, दुपारी एकला महाप्रसाद, सायंकाळी पाचला स्थानिक शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री आठला महाप्रसाद, साडेआठला महिलांचे कार्यक्रम होणार आहेत.
बुधवारी (ता. १०) सकाळी सातला मंगलाचरण, प्रकारशुद्धी, देवतांचा स्नानविधी, दुपारी एकपर्यंत ब्रह्मदिमंडलादी, देवतांची स्थापना, देवतांचा शैय्याधिवास, अग्निस्थापना, गृहस्थापना, वास्तुहोम, ग्रहयज्ञपूर्वक प्रधान पर्याय होम, कर्म समाप्ती, दुपारी एकला महाप्रसाद, सायंकाळी पाचला सांस्कृतिक कार्यक्रम व स्थानिक भजने, रात्री आठला महाप्रसाद, रात्री नऊला दशावतार नाटक होईल. गुरुवारी (ता. ११) सकाळी सातला मंगलाचरण, प्रकारशुद्धी, आवाहित देवतांची पूजा, अग्निअर्चण, तत्वहोम, ८.५० ला श्रीमत दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा होईल. ९.३२ ला मूर्ती प्रतिष्ठापना तत्वन्यास, पूर्वक प्राणप्रतिष्ठापना, देवतांची महापूजा, महाबलिदान आणि महापूर्णाहुती, प्रतिष्ठा उत्तरांग विधी, अभिषेक, विभूतीवंदन, देवालय उत्सर्ग, युप स्थापना, कर्म समाप्ती, दुपारी एकपासून महाआरती, गाऱ्हाणे, दोनला महाप्रसाद, तीनला देवीची ओटी भरणे व हळदीकुंकू, सायंकाळी चारला मान्यवरांचे सत्कार, रात्री आठला महाप्रसाद, नऊला बुवा उदय पारकर व बुवा संतोष मिराशी यांच्या डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन साळिस्ते ग्रामोत्कर्ष मुंबई, साळिस्ते ग्रामस्थ देवस्थान कमिटीने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT