कोकण

मळेवाडच्या विकासासाठी प्रयत्नशील

CD

01250
मळेवाड ः येथील भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सवाचा प्रारंभ करताना अर्चना घारे-परब. शेजारी रुपेश राऊळ, पुंडलिक दळवी आदी.

मळेवाडच्या विकासासाठी प्रयत्नशील

मान्यवरांचे उद्गार; सांस्कृतिक पर्यटन महोत्सवात ग्रामपंचायतीचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. ७ ः मळेवाड गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, असे उद्गार येथील भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी काढले. राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या हस्ते व शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सावाच्या चौथ्या दिवसाचा प्रारंभ झाला.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्यावतीने जकातनाका येथे पाच दिवसीय भव्य युवा सांस्कृतिक पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन केले होते. याच्या चौथ्या दिवशीचा प्रारंभ सौ. घारे-परब यांच्या हस्ते तर श्री. राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावातील वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. राऊळ यांनी मनोगत व्यक्त करताना या महोत्सवात अनेक पक्षाचे मान्यवर आमंत्रित केलेले असून सर्व समावेशक असा हा महोत्सव असून या महोत्सवाचे हे सहा वर्षे आहे आणि सहा वर्ष सातत्याने कोणताही कार्यक्रम सुरू ठेवणे यातूनच आयोजकांची ताकद दिसून येते. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अतिशय चांगले काम करत असून ग्रामस्थांनाही त्यांना चांगली साथ देत आहेत. गावाच्या विकासासाठी कधीही हाक मारा. मी सदैव तत्पर आहे, असे आश्वासन राऊळ यांनी दिले. यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुंडलिक दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना हेमंत मराठे व त्यांचे सहकारी गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करत असून गावाचा विकास हा प्रगतीपथावर असल्याचे मत व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी नक्कीच मजत करू, असाही शब्द दळवी यांनी दिला. यावेळी व्यासपीठावर हिदायत खान, सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, अमोल नाईक, मधुकर जाधव, कविता शेगडे, तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक, पोलिसपाटील दिगंबर मसुरकर, डॉ. गणपत टोपले, पत्रकार निलेश परब, रामचंद्र ऊर्फ बाबल नाईक, प्रकाश राऊत, गुरुप्रसाद नाईक आदी उपस्थित होते.
--
गावासाठी सर्वतोपरी मदत करू
या कार्यक्रमावेळी अर्चना घारे-परब म्हणाल्या, ‘‘गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत व मंडळ हे जे कार्य करत आहे, त्याचे कौतुकच. गावाचा विकास करत असताना आपल्याकडून सर्वतोपरी मदत करू. गावातील व्यक्तींनी ज्या क्षेत्रांमध्ये प्रवीण्य मिळवले त्यांचा सत्कार करून मंडळाने व ग्रामपंचायतीने त्यांना आणखी स्फूर्ती देण्याचे काम केले.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT