कोकण

आडिवरे नवेदरवाडीतील 44 महिलांनी घेतले देवदर्शन

CD

१२ (टुडे पान २ साठी)


- rat९p४.jpg-
२३M०१६०४
नाणीज ः आडिवरे- नवेदरमधील महिलांनी प्रथमच घराबाहेर पडत देवदर्शन घेतले.
-

आडिवरे नवेदरमधील महिलांनी घेतले देवदर्शन

रत्नागिरी, ता. ९ ः राजापूर तालुक्यातील आडिवरे-नवेदर गावातील नांदगावकर बंधू सर्व सेवा युवा मंडळातर्फे गावातील महिलांसाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. घरच्या कामांमध्ये गुंग असलेल्या गावातील ४४ महिलांनी प्रथमच घराबाहेर पडत देवदर्शन घेतले. या वेळी प्रख्यात श्रीक्षेत्र गणपतीपुळे, पावस येथील स्वामी स्वरूपानंद तसेच नाणीज येथे जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज मठ या तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात आल्या आहेत.
मंडळाचे कार्याध्यक्ष अभिजित नांदगावकर यांनी ही आगळी संकल्पना मांडली. त्याला अध्यक्ष जितेंद्र नांदगावकर, सचिव वैभव नांदगावकर आणि सर्व सदस्यांनी मूर्त स्वरूप दिले. या अभिनव संकल्पनेनुसार युवा मंडळाने हा उपक्रम राबवला. या सहलीचे नाणीज येथे स्वागत करण्यासाठी लांजा तालुका पांचाळ सुतार समाजाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सुतार व लांजा येथील अॅड. धनश्री सुतार हे आवर्जून उपस्थित होते. डॉ. सुतार यांनी मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले व मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या या उपक्रमाला राजापूर एसटी आगारतर्फे बस उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र नांदगावकर, सचिव वैभव नांदगावकर, खजिनदार अभिषेक नांदगावकर यांच्यासह मंडळाचे सदस्य राकेश नांदगावकर, किरण नांदगावकर, विशाल नांदगावकर, दीपेश नांदगावकर, दुर्गेश नांदगावकर, भूषण नांदगावकर यांच्यासह सर्व नांदगावकर बंधू उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT