कोकण

पाडलोसला आज वर्धापन सोहळा

CD

01636
श्री देव रवळनाथ

पाडलोसला आज
वर्धापन सोहळा
बांदा, ता. ९ ः पाडलोस रवळनाथ मंदिराचा वर्धापनदिन सोहळा उद्या (ता. १०) साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ७ वाजता देवतांना स्नान, अभिषेक, विधीवत पूजापाठ, १०.३० वाजता श्रींची महापूजा, महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिकांचे भजन, ७ वाजता मुंबई स्थित मालवण येथील बुवा विशाल मसूरकर यांच्या सुस्वर संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा ट्रिकसीनयुक्त ‘भेद कुष्मांडाचा, महिमा टेंबलाईचा’ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाडलोस ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
-------------
कणकवलीत आज
धार्मिक कार्यक्रम
कणकवली, ता. ९ ः कणकवली पटकीदेवी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या (ता. १०) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ८.३० वाजता लघुरुद्र, १० वाजता श्रींची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ५ वाजता बुवा वैभव नानचे यांचे भजन, सायंकाळी ६ वाजता बुवा सत्यम बागवे यांचे भजन, ७ वाजता बुवा सुजित परब यांचे भजन, रात्री ८ वाजता बुवा रवी राणे यांचे भजन, रात्री ९ वाजता स्थानिक महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन पटकीदेवी कला, क्रीडा आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
-------------
उड्डाणपूल बनतोय
तळीरामांचा अड्डा
कणकवली, ता. ९ ः येथील उड्डाणपुलावर मद्यपींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दारू, बिअर पिल्यानंतर बाटल्या तेथेच टाकून देण्यात येत आहेत. सद्यस्थितीत हे दररोजचेच झाले असून गस्तीवर असलेली पोलिस यंत्रणा नेमके काय करते, असा सवाल नागरिक, वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. कणकवली शहरातील या उड्डाणपुलावर गेल्या काही कालावधीत मद्यपींची संख्या वाढताना दिसत आहे. अलीकडे दररोज मोठ्या प्रमाणात बाटल्या टाकलेल्या दिसत आहेत. काहीवेळा या बाटल्या फोडून टाकल्या जातात. त्यामुळे वाहनांनाही धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: दमदार सुरुवातीनंतर बेंगळुरूने झटपट गमावल्या तीन विकेट्स

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT