कोकण

सीएनजी रिक्षाचालकांकडून पूर्वीप्रमाणेच भाडे

CD

१५ (पान २ साठी)

रिक्षाचालकांकडून पूर्वीप्रमाणेच भाडे


सीएनजी असूनही ग्राहकांची लूट ; रिक्षाचालक म्हणतात आमचे म्हणे ऐका

चिपळूण, ता. ९ ः आरटीओने ठरवून दिलेल्या नियमानुसार, ना मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा पत्ता, ना गणवेश, रस्त्यावर कुठेही थांबायचे, उलट दादागिरीची भाषा, यामुळे काही बोलायला वावच नाही, अशा शब्दांत चिपळूणमधील नागरिकांमधून रिक्षाचालकांबद्दल सूर उमटू लागला आहे. शहरातील अनेक रिक्षा सीएनजीवर धावत असल्या तरी रिक्षाचे भाडे कमी झालेले नाही.
काही रिक्षाचालकांची प्रवाशांकडून पूर्वीप्रमाणेच लूट सुरू आहे. दुसरीकडे रिक्षाचालकांनी आमचे म्हणणे न ऐकता कारवाईचीच भाषा केली जाते, अशी भावना व्यक्त केली.
सर्वसामान्य माणूस रिक्षातून प्रवास करत असताना मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही. विचारणा केली तर थातूरमातूर कारणे दिली जातात. गुरुवारी सायंकाळी गणेश कुलकर्णी पागेवरून रिक्षाने चिपळूण बसस्थानकावर आले. रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे भाडे न घेता चक्‍क दीडशे रुपये सांगितले. त्यामुळे रिक्षाचालक आणि कुलकर्णी यांच्यामध्ये वाद झाला. विशेष म्हणजे सीएनजीवर रिक्षा चालत असताना चालकाने दीडशे रुपये सांगितले. त्यामुळे कुलकर्णी यांनी रिक्षाचालकाशी हुज्जत घातली. पूर्वी रिक्षा पेट्रोलवर चालायच्या त्यामुळे जास्त भाडे सांगितले तरी आम्ही ते देत होतो. आता रिक्षा सीएनजीवर चालतात. त्यामुळे रिक्षाचालकांनी भाडे आकारताना विचार केला पाहिजे.
---
कोट
महागाईमुळे आम्हाला प्रवासी वाहतूक परवडत नाही. पेट्रोल आणि सीएनजीच्या दरवाढीवर विचार केला जात नाही. सीएनजी वेळेवर मिळत नाही. पेट्रोल आणि सीएनजीच्या दरात फार फरक नाही. याचा विचार न करता नुसते रिक्षाचालकांवरच कारवाईची भाषा होते. आमच्या समस्याही उपप्रादेशिक परिवहन विभागाने समजून घेऊन मार्ग काढला पाहिजे. सीएनजी गॅस कीट बसवण्यासाठी अनुदान द्यावे.
- सूरज चव्हाण, रिक्षाचालक, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT