कोकण

-राजापूर कुणबी पतपेढीची निवडणूक बिनविरोध करणार

CD

२६ (टुडे पान ४ साठी)


-rat९p२०.jpg ः
२३M०१६७२
राजापूर ः कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने प्रकाश कातकर यांचा सत्कार करताना दीपक बेंद्रे.
---

कुणबी पतपेढीत तरुणांना संधी द्या

बैठकीत प्रस्ताव ; बिनविरोधसाठी प्रयत्न

राजापूर, ता.१० ः राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या यापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. हीच परंपरा आगामी काळातील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कायम ठेवण्याचा निर्धार कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समिती शाखा राजापूरच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. .
कुणबी संघाच्या ग्रामीण समितीचे अध्यक्ष दीपक बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी समाजभवन येथे झालेल्या या सभेला उपाध्यक्ष रविकांत भामत, प्रकाश कातकर, खजिनदार प्रकाश लोळगे, सचिव मानसी दिवटे, सहसचिव श्रीकांत राघव, सदस्य सुरेंद्र तांबे, सुरेश बाईत, तानाजी मासये, गोपाळ गोंडाळ, मोहन घुमे, अशोक डोंगरकर, प्रकाश पुजारी, पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश मांडवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, राजू कार्शिंकर आदी उपस्थित होते.
या सभेमध्ये पतपेढीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. सुरवातीला लोळगे यांनी विद्यमान संचालक मंडळाला यापुढे पुन्हा संचालक म्हणून संधी द्यावी अशी सूचना मांडली. त्यांच्या या सूचनेला भामत यांनी आक्षेप घेत नवीन तरुणांना संधी मिळावी असे मत मांडले. तांबे यांनी विभागवार बैठका घेऊन समाजबांधव व सभासदांची मते अजमावून घ्यावीत व संचालक निवडणूक बिनविरोध करावी, अशी सूचना मांडली. त्याला कार्शिगकर यांनी अनुमोदन दिले. त्यावर तांबे यांच्या सुचनेनुसार, प्रत्येक पंचायत समिती गणामधून इच्छुक उमेदवारांकडून नावे मागवण्यात यावीत. त्यानंतर, सर्व पंचायत समिती गणामध्ये जेवढे संघाचे सदस्य व कार्यकर्ते आहेत त्यांच्या विभागवार सभेचे आयोजन करून समाजबांधव पतपेढीच्या विकासासाठी जे उमेदवार देतील तेच उमेदवार बिनविरोध निवडून द्यावेत, असा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी, सभेच्या प्रारंभी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश कातकर यांची राजापूर अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करून बेंद्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT