कोकण

सावंतवाडी तालुक्यामध्ये अनधिकृत वाळू वाहतूक

CD

टीपः swt१२११.jpg मध्ये फोटो आहे.
परशुराम उपरकर

सावंतवाडी तालुक्यामध्ये
अनधिकृत वाळू वाहतूक

परशुराम उपरकर; आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांच्या समक्ष अनधिकृत व ओव्हरलोड वाळू वाहतूक जोमात सुरू असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून वाळू वाहतूक करणारे डंपर सोडण्यात येत आहेत. याप्रकरणी येथील तहसीलदारांना जाग आणण्यासाठी मनसेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दिला.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतुकीवर एकीकडे कारवाई होत असताना तालुक्यात मात्र महसूल विभागाकडून अनधिकृत व ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे डंपर राजरोसपणे सोडले जात असल्याचा दावा त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला. त्यात नमूद आहे की, ‘जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळू वाहतुकीला चाप बसावा, यासाठी सगळीकडे महसूल विभागाची भरारी पथके नेमली आहेत. तशीच पथके तालुक्यात ठिकठिकाणी तैनात केली आहेत; मात्र त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही वाळू माफिया, लोकप्रतिनिधी व तहसीलदारांच्या आशीर्वादाने बऱ्याचदा कारवाई न करता डंपर सोडून देण्याचे प्रकार सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला सावंतवाडी महसूलने केराची टोपली दाखवली आहे. तालुक्यात तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली तैनात केलेली भरारी पथकेही कारवाई करताना दिसत नाहीत. प्रत्यक्षात अवैध वाळू वाहतूक सुरुच आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, असा दावा श्री. उपरकर यांनी केला असून सावंतवाडी तहसीलदारांना जाग आणण्यासाठी मनसेतर्फे लवकरच तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT