कोकण

खेडमध्ये 19 गाव 49 वाड्यात धावतोय एकच टॅंकर

CD

२२ (पान २ साठी)

खेडमधील ४९ वाड्यात एकच टॅंकर

खेड, ता. १२ ः तालुक्यात रणरणत्या उन्हामुळे उपलब्ध नैसगिक जलस्रोत आटत चालले असून पाणीटंचाईचा दाह वाढत आहे. सद्यःस्थितीत तालुक्यातील १९ गावे ४१ वाड्या पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडले आहेत. २ गावे ७ वाड्या अद्यापही तहानलेल्या असून, या गाववाड्यांना पाणीपुरवठा करण्याऱ्या टॅंकरची प्रतीक्षा आहे.
उन्हाच्या काहिलीने पाणीटंचाई तीव्र बनत चालली असून टंचाईग्रस्त गाववाड्यांमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विशेषतः धनगरवाड्यांमध्ये पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. सद्यःस्थितीत पोसरेबुद्रुक सडेवाडी, केळणे-भोसलेवाडी, मांगलेवाडी, चिरणी धनगरवाडी, खवटी खालचीवरची, धनगरवाडी, खोपी रामजीवाडी, सवणस, मूळगाव कुळवंडी शिंदेवाडी, मधलीवाडी, देवसडे कदमवाडी, सावंतवाडी, वैरागवाडी, बौद्धवाडी, जाधववाडी, मधलीवाडी, कोंडीवली, शिंदेवाडी, भाववाडी, वावळवाडी, मोहल्ला, बौद्धवाडी, रोहिदासवाडी, निळीक खालचा मोहल्ला, बौद्धवाडी, भुवडवाडी, मराठवाडी, घेरारसाळगड, निमणीवाडी, धनगरवाडी, चिंचघर दस्तुरी, तिसंगी धनगरवाडी आदी गाववाड्यात पाणीटंचाई जाणवत आहे तसेच कशेंडी बोरटोक, कशेडी बंगला, थापेवाडी, शिंदेवाडी, तुळशीबुद्रुक, तुळशीखुर्द, कुबजई, धनगरवाडी, सवेणी धनगरवाडी, मांडवे कोसमवाडी, अस्तान कातकरवाडी, जोरकरवाडी, चाटव धनगरवाडी आदी गाववाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असून, ग्रामस्थ टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.
मोरवंडे-पिंपळवाडी, बौद्धवाडी, मोदगेवाडी, मधलीवाडी, सुतार कुंभारवाडी, पंडमवाडी, सुकिवली सोनारवाडी येथील ग्रामस्थांनीही टॅंकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. १९ गावे ४९ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या गाववाड्यांना सुकिवली येथील चोरद नदीपात्रातून पाणीपुरवठा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT