कोकण

तळेरे दत्त मंदिरचा जिर्णोद्धार सोहळा तळेरे दत्त मंदिरचा जिर्णोद्धार सोहळा

CD

02373
श्री दत्त मंदिर

तळेरे दत्त मंदिरचा जिर्णोद्धार सोहळा

आजपासून धार्मिक कार्यक्रम; श्री. उल्हासगिरी महाराजांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १२ ः औदुंबरनगर येथील श्री दत्त मंदिरचा जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित केला असून यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला उद्यापासून (ता.१३) सुरुवात होणार असून सोमवारी (ता.१५) प. पू. श्री. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे.
उदया दुपारी तीनला श्री. दत्तमूर्तीची श्री गांगेश्वर मंदिर ते श्री दत्त मंदिर अशी ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी सुंदर चित्ररथ व शिडवणे (कोणेवाडी) येथील श्री. गांगेश्वर ढोल पथक यांचे ढोल वादन व शिडवणे येथील माऊली प्रासादिक वारकरी दिंडी भजन मंडळ यांचे विशेष आकर्षण असणार आहे.
१४ ला सकाळी सातला तळेरे-घाडीवाडी येथील श्री गांगेश्वर ढोल पथक यांचे ढोल वादन, त्यानंतर प्रायश्चित्त देवांना प्रधान, गाऱ्हाणे, संकल्प, पुण्याहवाचन, मातृता पूजन, जलाधिवास, निद्राधिवास, धान्याधिवास, प्राकार शुध्दि, मंडल देवता आवाहन, अग्नी स्थापना, पर्यायवहन आदी धार्मिक विधी होतील. दुपारी एकला महाप्रसाद (भंडारा), त्यानंतर ढोल वादन, साडेतीन ते साडेचार श्री. दत्त जन्म आख्यान वाचन, साडेचार ते साडेपाच श्री खापरेश्वर फुगडी मंडळ (मापारवाडी) यांचे पारंपरिक फुगडी नृत्य होईल. त्यानंतर श्री गांगेश्वर भजन मंडळ तळेरे (गावठण) बुवा संतोष तळेकर, शेवरादेवी भजन मंडळ तळेरे (वाघाचीवाडी) बुवा राजू वळंजू, श्री पावणादेवी भजन मंडळ तोंडवली बुवा संतोष मिराशी, रात्री साडेआठ ते साडेनऊ वारगाव-गोकुळवाडी येथील बुवा दीपक नामये यांचे पारंपरिक वारकरी भजन त्यानंतर स्थानिक भजने व शिरवली-महादेवाचीवाडी येथील बुवा सागर मोहिते यांचे वारकरी भजन सादर होईल. १५ ला सकाळी सात ते आठ ढोलवादन, आठला धार्मिक विधी (प्राकार शुद्धी, मंडल देवता पूजन) त्यानंतर सकाळी ९.५२ ला ओणी येथील श्री. प. पू. गगनगिरी महाराज यांचे शिष्य प. पू. श्री. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठापना होईल. त्यानंतर तत्वहोम, महापूजा, बलिदान, पुर्नाहूती, आरती, मंत्र पुष्प आदी, दुपारी दीडला महाप्रसाद (भंडारा), दुपारी तीन ते चार हळदीकुंकु समारंभ, ४ ते ५ कवीलकाटे येथील श्री देवी चांमुडेश्वरी फुगडी मंडळ यांचे पारंपरिक फुगडी नृत्य होईल. त्यानंतर गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तिवरे बुवा साहिल परब यांचे संगीत भजन, आनंदयुवा भजन संघ मुंबई बुवा नंदादीप वंजारे यांचे भजन सादर होणार आहे. रात्री नऊला सत्कार समारंभ होणार आहे. रात्री साडेदहाला चंद्रभागा प्रॉडक्शन निर्मित ‘आलाय मोठा शहाणा’ हे धमाल विनोदी नाटक होईल. या कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री दत्त प्रासादिक सेवा मंडळ आणि महिला मंडळ तळेरे (औदुंबरनगर) यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT