कोकण

वालावलमध्ये कर्तृत्ववान माय-लेकींचा सत्कार

CD

swt147.jpg
2833
वालावलः येथे मातृदिनानिमित्त श्रीरंग फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान माय-लेकींचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला.

वालावलमध्ये कर्तृत्ववान माय-लेकींचा सत्कार
श्रीरंग फाउंडेशनचा पुढाकार ः जागतिक मातृदिनानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १४ : राज्यातील अंध, दिव्यांग, अॅसिड व्हिक्टिमसहित विविध वंचित घटकांसोबत काम करणाऱ्या श्रीरंग फाउंडेशनच्यावतीने ''मदर्स डे''च्या निमित्ताने कर्तृत्ववान माय-लेकींचा कौतुक सोहळा पार पडला. हा कार्यक्रम शनिवारी (ता. १३) वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात झाला.
यावेळी आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केलेल्या माय-लेकींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली माऊली-नानी आणि तिची लेक, महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपत आपल्या प्रदेशातील पांरपरिक लोककलेला एक वेगळी ओळख देत त्या कलांचे संवर्धन करणारी लोककला, बोलीभाषा जपणारी अर्चना आणि तिची माय, आपली संस्कृती जपताना नऊवारी साडी नेसून आजपर्यंत नव्वदवर किल्ले सर केलेल्या सुवर्णा वायंगणकर आणि त्यांची आई, जगातल्या रंजलेल्या गांजलेल्या प्रत्येकाच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणाऱ्या श्रद्धा आणि त्यांची आई, वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगांवर मात करत स्वत:चा ''तळेकरीण'' ब्रॅण्ड निर्माण करणाऱ्या वर्षा तळेकर आणि त्यांची आई, तृतीयपंथीय असूनही उच्चशिक्षित बनून स्वत:ची वेगळी ओळख बनविणारी निष्ठा निशांत आणि ह्या सगळ्या प्रवासात तिला भक्कम आधार देणारी तिची आई या मायलेकींच्या कर्तृत्वाचा सन्मान यावेळी करण्यात आला.
मायलेकींचे नात जगाला माया, ममता, करुणेसह जिद्द, कर्तृत्वही दाखविते, हे या मायलेकींच्या कहाणीतून दिसते. त्यांची कहाणी जगासमोर यावी, त्यांच्या कार्याची दखल घ्यावी, यासाठी श्रीरंग फाउंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संस्थापक सुमित पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT