कोकण

रत्नागिरी- यशोधन देवधर

CD

rat१४p२७.jpg- यशोधन देवधरKOP२३M०२८७४


यशोधनची लोकसभा अध्यक्षासमोर चमक

रवींद्रनाथांवर इंग्रजीत भाषण ; ३० विद्यार्थ्यात महाराष्ट्रातून एकमेव

रत्नागिरी, ता. १५ : नवी दिल्लीतील संसद भवन आणि तिथली कार्यालये पाहून मला खूपच आनंद झाला आणि एक ना एक दिवस या कार्यालयांत संधी मिळेल. नेहरू युवा संघटननमुळे मला व्यासपीठ मिळाले. त्यातून नवीन माहिती मिळते आणि व्यक्तीमत्व विकासही होतो, असे यशोधन प्रसाद देवधर याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर भाषण करता आले आणि त्यांचेही भाषण ऐकता आल्याबद्दल यशोधनने समाधान व्यक्त केले.
युवा संसद उपक्रमाअंतर्गत यशोधन नुकताच संसद भवनामध्ये भारतरत्न रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती कार्यक्रमात टागोरांबद्दल विचार मांडून रत्नागिरीत परतला. देशातील ३० विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातून यशोधन एकमेव होता. मुळचा विजयदुर्ग येथील यशोधन रत्नागिरीतील फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये आयटीच्या द्वितीय वर्षात शिकतोय. राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त लोकसभा सचिवालय आयोजित उपक्रम अंतर्गत यशोधनला ही संधी मिळाली.
फेब्रुवारीमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात यशोधनने राष्ट्र निर्माणात युवकांचा सहभाग या विषयावर भाषण दिले होते. त्यात निवड झाल्यानंतर राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा झाली. यातून पाच विद्यार्थ्यांची निवड केली. पाचव्या क्रमांकावर असलेल्या यशोधनला राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठ मिळाले. वेगवेगळ्या राज्यांतील युवक, युवती आल्यामुळे तिथल्या संस्कृतीबद्दल माहिती मिळाल्याचे यशोधन म्हणाला.

--
मुंबई युवा संसदेतही यशोधन
यापूर्वी यशोधनने नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबई युवा संसदेत भाग घेतला होता. त्यावेळी नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेतून त्याला राज्यस्तरावर ही संधी मिळाली होती. तेव्हा दोन दिवस विधानभवनात संरक्षण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या वेळी त्याला संसदेमध्ये जयंती कार्यक्रमात भाषणाची संधी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अभिनेते शेखर सुमन यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT