कोकण

लांजा-गांजाची खुलेआम विक्रीने पालक त्रस्त

CD

गांजाची खुलेआम विक्रीने पालक त्रस्त
पोलिस, तहसीलदारांना निवेदन ; कठोर कारवाईची मागणी
लांजा, ता. १५ ः लांजा शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन यामुळे भावी पिढी या अंमली पदार्थाच्या आहारी जात असून त्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढीस लागले आहे. या विरोधात पोलिस कठोर कारवाई करत नसल्याने आक्रमक झालेल्या लांजावासीयांच्या वतीने पोलिस निरीक्षक, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, येत्या १५ दिवसात लांजा शहरात बेकायदेशीरपणे होणारी अंमली पदार्थ विक्री आणि सेवन या विरोधात तातडीने पावले उचलावीत अन्यथा लांजा गावातील नागरिकांच्यावतीने या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा देण्यात आला. लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, नायब तहसीलदार उज्ज्वला केळकर यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची राजरोसपणे विक्री होत असून. अशा प्रकारच्या समाजास घातक ठरणाऱ्या गोष्टींना पायबंद घालण्याऐवजी पोलिसांकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. वेळोवेळी पोलिस यंत्रणेशी येथील नागरिकांनी चर्चा विनंती करूनही ठोस पावले उचलली जात नाहीत आणि त्यामुळेच शहरात राजरोसपणे अंमली पदार्थाची विक्री, सेवन सुरू आहे. पुढील १५ दिवसात शहरातील ज्या ज्या ठिकाणी ही बेकायदेशीर होणारी अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन यावर तातडीने निर्बंध घालावेत आणि लांजा शहर या अंमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, ग्रामस्थ आणि पोलिस यंत्रणा या दोघांच्या सहकार्याने ही कीड नष्ट करू या, असे ठोस आश्वासन पोलिस निरीक्षक घुटुकडे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT