कोकण

कासार्डे शाळेत गुरुजनांचा गुणगौरव

CD

03233
कासार्डे ः केंद्रशाळा नंबर १ येथे बदली व निवृत्त झालेल्या गुरुजनांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. (छायाचित्र : एन. पावसकर)


कासार्डे शाळेत गुरुजनांचा गुणगौरव

ग्रामस्थांचा उपक्रम; उल्लेखनीय कार्य, सेवेचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १६ : केंद्रशाळा कासार्डे नंबर १ येथे शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, सर्व ग्रामस्थ व पालकांतर्फे शाळेतील गुरुजनांच्या बहुमोल कार्याचा व कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बदली झालेले शिक्षक आणि निवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कासार्डे केंद्रशाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राणे, उपशिक्षिका सुप्रिया म्हसकर, पूजा मुसळे, प्रतिभा पाटील, माजी मुख्याध्यापिका रंजना नारकर आणि स्वयंसेवक म्हणून गेली तीन महिने शाळेत कार्यरत असणाऱ्या अंकिता पाताडे यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग शेटये, कासार्डे विकास मंडळ स्थानिक कमिटी कार्याध्यक्ष संजय पाताडे यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी माजी विस्तार अधिकारी सुहास पाताडे, माजी विस्तार अधिकारी विठोबा सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार पाताडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सावंत, पोलिस पाटील महेंद्र देवरुखकर, निवृत्त शिक्षक विजय सावंत, विजय कदम, योगेश कदम, जान्हवी परब, भाई पाटील, जाकीर शेख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुप्रसाद सावंत, उपाध्यक्ष प्रमोद शेटये, गणेश नकाशे, जगदीश शेटये, महेश पेडणेकर, अभिमन्यू पाताडे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी शुभेच्छापत्र व भेटवस्तू देत शिक्षकांविषयी भावना व्यक्त केल्या. मान्यवरांनी आणि पालकांनी आपल्या मनोगतात सर्वांनी शाळेच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक व विविध स्पर्धा परीक्षेत मिळालेल्या यशाबाबत गौरवोद्गार काढले. वैभववाडी गटविकास अधिकारी व या शाळेचे माजी विद्यार्थी जयप्रकाश परब यांनी ‘पंखाविना भरारी’ हे पुस्तक देऊन शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. केंद्रप्रमुख संजय पवार यांनी शिक्षकांनी कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
सर्व शिक्षकांनी मनोगतात सर्वांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुप्रसाद सावंत, उपाध्यक्ष प्रमोद शेटये, पालक भाई पाटील, जाकीर शेख, गणेश नकाशे, अंकिता पाताडे व अन्य महिला पालकांनी परिश्रम घेतले. जाकीर शेख, भाई पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT