कोकण

तुकारामांच्या पुण्यतिथीला शाहिरांची अमोघ वाणी

CD

१२ (टूडे ४ साठी)

- Rat१७p५.jpg ः
२३M०३३१६
पाले ः (कै.) तुकारामबुवा माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनोगतातून कला मार्गदर्शन करताना रामचंद्र म्हात्रे, रमेश घडवले, रामभाऊ टेंबे, विद्यानंद अधिकारी.

घुमली शाहिरांची अमोघ वाणी

पाले येथे आयोजन; लोककलेच्या सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध

मंडणगड, ता. १७ ः संभुराजू घराण्यातील गुरूवर्य महाराष्ट्र गौरव भूषण शाहीर (कै.) तुकारामबुवा माळी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणात शक्ती तुरामधील नामवंत शाहिरांची अमोघ वाणी घुमली. निकोप कलाभाव जोपासण्याचे आवाहन करताना गुरूवर्य मंडळींनी या लोककलेचे विविध पैलू उघडताना कलात्मक मार्गदर्शनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पाले गावी १५ मे रोजी तुकाराम माळी यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. पाले खालची आळी मंडळाच्यावतीने नव्याने बांधण्यात आलेल्या गुरूवर्य तुकारामबुवा माळी रंगमंचाचे उद्घाटन शांताराम वणे व पांडुरंग वणे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शाहीर प्रमोद वणे, संदेश वणे, नथुराम वणे यांनी काव्यातून आदरांजली वाहिली. स्वागतानंतर प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश घडवले, कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे, गुरूवर्य पांडुरंग नांदवीकर, तज्ञ परीक्षक रामचंद्र म्हात्रे, मानधन कमिटी सदस्य संतोष पार्टे आदींनी आपल्या मनोगतातून माळीबुवांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करत कलाक्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या संयमी, शांत स्वभावाचे वर्णन करून बौद्धिक क्षमता दर्शवणाऱ्या घटनांचे वर्णन केले.
जाखडी नाच, तमाशा ही लोककला वाढवण्यासाठी व जोपासण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे दाखले दिले. कार्यक्रमाला गुरूमाऊली सुवर्णा माळी, पाले सरपंच संध्या वणे, माहू बोरघरचे सरपंच विजय बाईत, उपसरपंच नीलेश जाधव, शिवराम पोटले, बाळाराम भोसतेकर, प्रभाकर बिरवाडकर, शीतल विचारे, महादेव माळी, अनिल किजबिले, विलास घाग, नरेश कदम, अनंत माळी व शिष्य मंडळी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT