कोकण

कलाकारांना सुरक्षाकवच

CD

१३ (टूडे ४ साठी, अँकर)

Rat१७p४.jpg ः
२३M०३३१५
पाले ः कलाकारांना अपघाती एक लाखाच्या विमासुरक्षा प्रमाणपत्राचे वाटप करताना मान्यवर.

कलाकारांना एक लाखाचे विमा सुरक्षा कवच

संभुराजू मंडळाचा उपक्रम ः ४०० कलाकारांना लाभाचा संकल्प

मंडणगड, ता. १७ ः संभुराजू तुरेवाले सांस्कृतिक उन्नती मंडळाच्यावतीने आजीव सभासद झालेल्या कलाकारांना १ लाखांचे अपघाती विमा सुरक्षाकवच देण्याचा अभिनव उपक्रम पार पडला. या स्तुत्य उपक्रमाचे कलाक्षेत्रात कौतुक करण्यात येत असून, कला इतिहासात असा उपक्रम प्रथमच घेण्यात आला असून ४०० कलाकारांना त्याचा लाभ देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
गुरूवर्य महाराष्ट्र गौरव भूषण शाहीर (कै.) तुकारामबुवा माळी यांचा द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम १५ मे रोजी घेण्यात आला. या वेळी विमा सुरक्षाकवच प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. स्व. शाहीर पांडुरंग अधिकारी सेवाभावी संस्था पेण, तळे यांच्या माध्यमातून संभुराजू तुरेवाले सांस्कृतिक उन्नती मंडळाच्या आजीव सभासद कलाकारांना याचा लाभ देण्यात येत आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंडणगड तालुक्यातील पाट, शेनाळे, मंडणगड, पाले गावातील कलाकारांना विमा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच महाड, माणगाव येथील सभासद कलाकारांनादेखील याचे वितरण करण्यात आले. आपली कला सादर करण्यासाठी कलाकार अनेक ठिकाणी रात्री-अपरात्री प्रवास करत असतात. दुर्दैवाने, एखादी अनुचित घटना घडल्यास त्याचा थेट फायदा त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष विद्यानंद अधिकारी यांनी पुढाकार घेत ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले. त्याला सर्व सहकारी सदस्यांनी साथ दिली.
या कार्यक्रमाला संभुराजू तुरेवाले मंडळाचे अध्यक्ष रमेश घडवले, कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे, सरपंच संध्या वणे, उपसरपंच नीलेश जाधव, गुरूवर्य पांडुरंग नांदविकर, रामचंद्र म्हात्रे, सदानंद वाडकर, महादेव सुतार, दत्ता देवळे, पांडुरंग बाईत, शिवराम पोटले, प्रल्हाद शिरशिवकर व कलाक्षेत्रातील शाहीर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT