कोकण

वड्डी गावाजवळ भीषण अपघात पाच ठार

CD

05137
मिरज : येथील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाल्यानंतर वाहनांची झालेली अवस्था.

वड्डी गावाजवळ भीषण अपघात पाच ठार

पती, पत्नी मुलाचा समावेश; दोन मुली बचावल्या

सकाळ वृत्तसेवा
मिरज, ता. १७ : पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला वड्डी (ता. मिरज) येथे भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीच्या धडकेत बारा वर्षीय मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. दोन मुली जखमी आहेत. मृत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहेत. आज सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये चारचाकी गाडीचा चालक उमेश उदय शर्मा (वय २२, रा. शियेवाडी, ता. राधानगरी), जयवंत दत्तात्रय पोवार (४२, रा. सरवडे, ता. राधानगरी), स्नेहल जयवंत पोवार (४०), सोहम जयवंत पोवार (१२), लक्ष्मण शंकर शिंदे (७०, रा. बानगे ता. कागल), कोमल श्रीकांत शिंदे (५६, रा. रोहिदासनगर, इचलकरंजी) हे ठार झाले; तर मुलगी साक्षी जयवंत पोवार आणि श्रावणी जयवंत पोवार हे जखमी झाले आहेत.
पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की सरवडे (ता. राधानगरी) येथील जयवंत पवार हे पती स्नेहल पोवार, मुलगा सोहम पोवार, दोन मुली साक्षी पोवार, श्रावणी पोवार या कुटुंबासह पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी निघाले होते. त्यांनी इचलकरंजी येथील नातेवाईकांना सोबत घेतले होते. जाताना वड्डी येथे राजीवनगर येथे बायपासला त्यांच्या गाडीला अपघात झाला.
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा मालगाव फाटा ते मिरज टप्पा अपूर्ण होता. तो दोन दिवसांपूर्वीच सुरू झाला आहे. या रस्त्यावरून भरधाव वाहतूक सुरू झाली आहे. याआधी रस्ता बंद असताना अनेक वाहने उलट-सुलट दिशेने हवी तशी धावत होती. आजही या भागातील एक वीट वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच १०, डीजी ८६८३) उलट दिशेने येत होता. चारचाकी गाडी (एमएच ०९, डीए ४९१२) चालकाला अशा पद्धतीने ट्रॅक्टर येईल, हे अपेक्षित नसावे. त्यामुळे त्यांची जोरदार धडक झाली. अपघाताची भीषणता भय्यावह होती. चारचाकीची ट्रॅक्टरला धडक बसल्यानंतर ट्रॅक्टरचा पुढील भाग पूर्णता चारचाकीत घुसला. यात चालक उमेश शर्मा, जयवंत पोवार, पत्नी स्नेहल पोवार, मुलगा सोहम पोवार आणि नातेवाईक लक्ष्मण शिंदे, कमल शिंदे यांचा मृत्यू झाला; तर पोवार यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या, यामध्ये श्रावणी हिच्या मेंदूला मार लागला असून, साक्षीच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोवार कुटुंबावर काळाने घाला घालून दोन मुलींचे आई-वडील आणि भाऊ हिरावल्यानंतर त्या मुलींचे आधार हरपल्याची चर्चा अपघात स्थळी सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT