कोकण

रत्नागिरी एसटी विभागाला 9 कोटींचे उत्पन्न

CD

३ (टुडे पान १ साठी, अॅंकर)


rat१८p१५.jpg-
२३M०३५४४

खेड ः बसस्थानकात झालेली प्रवाशांची गर्दी.
---
रत्नागिरी एसटी विभागाला ९ कोटींचे उत्पन्न

४६ लाख महिलांनी घेतला लाभ ; दैनंदिन प्रवाशांच्या संख्येत ६० हजाराने वाढ

महिला सन्मान योजना--लोगो

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः शिवसेना-भाजप युती सरकारने राज्यात १७ मार्चपासून एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के तिकीट सवलत जाहीर केली आणि एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत भरघोस वाढ झाली. महिला सन्मान योजनेत रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता आतापर्यंत तीन महिन्यांत ४६ लाख ३६ हजार ९३ महिलांनी प्रवास केला. यातून तब्बल ९ कोटी ३२ लाख ४६ हजार २५२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
एसटीच्या महिला प्रवाशांमध्ये झालेली ही वाढ साधारण ४५ टक्के आहे. दररोज रत्नागिरी जिल्ह्यात सव्वादोन लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. यामध्ये ९० हजार महिला प्रवाशांचा समावेश आहे. यापूर्वी दैनंदिन प्रवाशांची संख्या साधारण १ लाख ६५ हजार होती. यात वाढ होऊन ती सव्वादोन लाखांवर पोहोचली आहे, अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजना घोषित करून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमधील प्रवासात महिला व मुलींना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी १७ मार्चपासून झाली. त्या दिवसापासून महिला प्रवाशांची एसटीत गर्दी वाढली आहे. आता बसमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी जास्त पाहायला मिळते. एसटीत चढ-उतारासाठी महिलांचीच गर्दी असते.
-----
तोटा कमी होण्यास मदत

कोरोना काळापूर्वी एसटी महामंडळ प्रचंड तोट्यात होते. कोरोना कालखंडात ९० ते ९५ टक्के एसटी फेऱ्या बंद होत्या; परंतु आता महिला सन्मान योजना जाहीर केल्यानंतर एसटीचा तोटा कमी होऊ लागला आहे. ५० टक्के प्रवासाची रक्कम एसटीकडे जमा होत असून, उर्वरित ५० टक्के अनुदानाची रक्कम राज्य शासनाकडून एसटीला वेळोवेळी देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीचा संचित तोटा कमी होण्यास उपयोग होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT