कोकण

पूरग्रस्तांची भरपाई तात्काळ द्या

CD

swt१८१६.jpg
03592
सावंतवाडीः येथील तहसीलदार यांना निवेदन देताना शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी.

पूरग्रस्तांची भरपाई तात्काळ द्या
शिवसेना, वंचितची मागणीः सावंतवाडी तहसिलदारांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ः शहरात जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात बांदा व आसपासच्या गावातील ग्रामस्थ व दुकानदारांच्या नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत मिळाली नसून ती तात्काळ देण्यात यावी यासाठी शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, उपतालुका प्रमुख आबा सावंत, विभाग प्रमुख सुनील गावडे, सामाजिक कार्यकर्ते सुशील चौगुले, श्री ठाकूर श्री. बुगडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्यकारणी सदस्य गणपत चव्हाण, अमर धुरी, श्री.बांदेकर, गौरांग शेर्लेकर यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व नुकसानग्रस्त दुकानदार, गाळेधारक, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी गेले दोन वर्षे बांदा भागातील ग्रामस्थ शेतकरी, बांदा शहरातील नुकसानग्रस्त दुकानदार, गाळेधारक, ज्यांना अद्यापी भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. भरपाई देण्यासंदर्भात शासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. सदरील नुकसानग्रस्त विविध माध्यमातून आपल्यासह, वरिष्ठ पातळीवर निवेदने आंदोलने करत आहेत. त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली. मात्र, नुकसान भरपाई अदा करण्याबाबत आपल्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे-पाटील यांनी शासन स्तरावरून निधी उपलब्ध होताच सर्वांच्या नुकसान भरपाई बाबत तत्काळ कार्यवाही होईल असे आश्वासन दिले. राऊळ यांनी कार्यवाहीबाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांना मंत्रालयात याबाबत लक्ष वेधण्यासाठी व खासदार विनायक राऊत यांनाही याबाबत लक्ष घालण्यासाठी आपल्या जवळ असलेली माहिती द्या, असे सांगितल्यावर, ही माहिती देण्याचे मान्य केल्यामुळे येत्या काही दिवसात नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यास कार्यवाही होणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT