कोकण

हर्णैत मुबलक मासळीच्या दरात घट

CD

८ (पान २ साठी)

हर्णै बंदरात मासळीच्या दरात घट

हंगामाला राहिले १५ दिवस ; म्काकूळचा दर १३० रुपयावर

दाभोळ, ता. १८ ः दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात सध्या म्हाकूळ ही मासळी मुबलक मिळत असल्याने मच्छीमारांच्या आशा वाढत असल्या तरी व्यापाऱ्यांकडून मासळीच्या दरात ५० टक्क्यांची घट करण्यात आली आहे. यामुळे मच्छीमार पुन्हा चिंतेत पडला आहे. काही दिवसांपूर्वी ३०० रु. किलो दर मिळणारी म्हाकूळ लहान असल्याने १२० ते १३० रुपयांना विकावी लागत आहे. मासळी हंगाम जेमतेम १५ दिवसांचा शिल्लक असताना हर्णै बंदरात मासळीच्या दरात झालेली घसरण मच्छीमारांसाठी चिंतेची बाब बनली आहे. हर्णै बंदर कोळंबीसाठी प्रसिद्ध असले तरी यावर्षी कोळंबीची आवक कमी आहे; मात्र ही कसर म्हाकूळने भरून काढली आहे. कोळंबी व म्हाकूळ निर्यात होणारी मासळी आहे. हर्णै बंदरात काही दिवसांपर्यंत म्हाकूळला ३०० ते ३५० रुपयांपर्यंत दर मिळत होता; मात्र सध्या म्हाकूळचा आकार लहान असल्यामुळे त्याचा दर निम्म्यापेक्षा खाली आला आहे. अडीच हजार ते तीन हजार रुपयांना जाणारा बांगडा टब १ हजार रुपयांना विकावा लागत आहे. एटीएफ म्हाकूळ २ हजार ५०० रुपयांना जाणारा ५० किलोचा क्रेट सध्या ७०० रुपयात विकावा लागत असल्याची माहिती मच्छीमार व्यावसायिकांनी दिली. मासळी नाशवंत असल्यामुळे आणि हर्णै बंदरात सुसज्ज कोल्ड स्टोरेजची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे मिळेल त्या भावात मासळी विकावी लागत असल्याची खंत मच्छीमार व्यक्त करताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: भांडूपमध्ये निवडणूक भरारी पथकाची कारवाई, पैशांनी भरलेली व्हॅन जप्त

SCROLL FOR NEXT