कोकण

ः साहित्यिक अरूण मोर्ये यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

CD

२९ (पान ५ साठी)


-rat१८p२६.jpg-
२३M०३६१४
साहित्यिक अरूण मोर्ये यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना सरपंच सतीश थुळ, संजय बैकर, पांडुरंग काताळे, नितीन बैकर, अजय काताळे, प्रथमेश गावणकर आदी.
---------

साहित्यिक मोर्ये यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

रत्नागिरी, ता. १८ ः युवा साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे युवाशक्ती जिल्हाध्यक्ष अरूण मोर्ये यांच्या शापित सिंहासन अर्थात खरा वारसदार या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन सत्कोंडीचे सरपंच सतीश थुळ यांच्या हस्ते करण्यात आले.
ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर, पंचप्रमुख पांडुरंग काताळे, नितीन बैकर, अजय काताळे, प्रथमेश गावणकर आदी उपस्थित होते. या वेळी थुळ म्हणाले, ग्रामीण भागातील युवा मोर्ये हे सामाजिक कामासोबतच साहित्यक्षेत्रात अग्रस्थानी राहून आपले स्वतःचे असे स्थान निर्माण करत आहेत हे आमच्यासाठी कौतुकास्पद आहे. पुस्तक प्रकाशनासंदर्भात मोर्ये म्हणाले, आजवरच्या नमनाच्या ३० वर्षाच्या इतिहासात नमनात काम करताना आणि त्यानंतर गेल्या २५ वर्षात नमनासाठी वगनाट्य लिहिताना एकूण १३ वगनाट्य माझ्या हातून लिहिली गेली आणि त्यातील काहीच नाट्यसंहिता शिल्लक राहिल्या, बाकीच्या गहाळ झाल्या. या साहित्यकृतींचे जतन व्हावे म्हणून यावर्षी सादरीकरण करत असलेल्या वगनाट्याचे पुस्तकरूपाने प्रकाशन करण्याचा योग आला आणि यानंतर माझ्या हयातीत माझ्या सर्व साहित्याचे प्रकाशन लवकरात लवकर व्हावे यासाठी मी जरूर प्रयत्न करेन.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT