कोकण

नासा, इस्त्रो भेटीतील एक तरी विद्यार्थी कलाम बनावा

CD

४ (पान ५ साठीमेन)

-rat१८p१७.jpg-
२३M०३५५७
रत्नागिरी ः नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना पालकमंत्री उदय सामंत.
-rat१८p१८.jpg-
२३M०३५५८
रत्नागिरी ः पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार.
-------------

एकतरी विद्यार्थी ‘अब्दुल कलाम’ बनावा

उदय सामंत ; संशोधन संस्था भेटीसाठी भविष्यातही तरतूद

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः जिल्हा परिषद शाळेत शिकणारा शेतकरी कुटुंबातील नासा, इस्रोभेटीला गेलेल्यांपैकी एकतरी विद्यार्थी माजी राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांच्यासारखा झाला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच यंदा नासाला ९ विद्यार्थी जाणार आहेत, पुढील वर्षी २० जातील आणि इस्रोलाही ५० विद्यार्थी पाठवू, अशी तरतूद केली जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.
नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुळकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. सामंत यांच्या हस्ते मुलांचा सत्कार करण्यात आला. सामंत म्हणाले, जिल्हा परिषद शाळांमधील मुले नासा, इस्रोला नेण्यासाठी अधिकारी पाठपुरवा करत होते; पण शेतकऱ्यांची मुले पाठवण्याचा निर्णय कुणाला घेता आला नाही. त्यासाठी दीड कोटी लागणार होते. मुलांच्या भवितव्यासाठी कितीही फंड ओतावा लागला तरी चालेल; पण त्यांना पाठवायचे असा मी निर्णय घेतला. मी अमेरिकेला गेलेलो नाही; पण माझ्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुले तिकडे जात असल्याचा सार्थ अभिमान आहे. या उपक्रमाला दीड कोटीचे काय तर दीडशे कोटी खर्च करावे लागले तरीही ते देण्याची आमची तयारी आहे. इंग्रजी शाळेत शिकलो म्हणजे मंत्री होता येते, हा गैरसमज आहे. मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन इथपर्यंत पोचलो आहे, असे सांगत सामंत यांनी ग्रामीण भागातील शाळांचे महत्व पटवून दिले. कलाम आणि शिक्षक यांचे जवळचे नाते आहे. माजी राष्ट्रपती कलाम यांची भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितले, भारत बलशाली करायचे असेल तर पहिली ते चौथीचा पाया भक्कम झाला पाहिजे. त्यासाठी विविध उपक्रम राबवले पाहिजेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सहाही भारतरत्नांची माहिती प्रत्येकाला व्हावी यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या मदतीने मोठा प्रकल्प रत्नागिरीत बनवण्यात येत आहे.
----
चौकट
शिक्षक मुलांसोबत पाठवणार
रत्नागिरीतील शिक्षकांसारखे शिक्षक अन्य कुठेही दिसत नाहीत, असे सांगत शिक्षकांचा सामंत यांनी गौरव केला. ते म्हणाले, एका आदर्श प्राथमिक शिक्षकाला मुलांसोबत नासाला पाठवावे. त्यात महिलांना प्राधान्य असले पाहिजे. पुढील वर्षी शिक्षकांमध्ये स्पर्धा घ्यावी आणि त्यामधून निवड करावी. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून आर्थिक तरतूद केली जाईल. उद्योगमंत्री झाल्यानंतर जिल्हा परिषदेला सीएसआरमधून ५ कोटी जमा करून देणार आहे. त्यातील १ कोटी पोचले आहेत. त्याचा उपयोग शाळा दुरुस्तीसाठी केला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT