कोकण

मडुरावासियांची तिलारी कार्यालयावर धडक

CD

swt1824.jpg
03663
सावंतवाडी ः चराठा येथे तिलारी कालव्याच्या पाण्यासाठी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना निवेदन देताना सुरेश गावडे. सोबत लक्ष्मण निगुडकर, उदय देऊलकर व अन्य.

मडुरावासियांची तिलारी कार्यालयावर धडक
पाणीपुरवठ्यासाठी आक्रमक ः पूर्ववत करण्याचे अभियंत्यांचे अभिवचन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ः भर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असताना तिलारी कालव्यातील पाणीपुरवठा बंद केल्याने मडुरा दशक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांनी तिलारी कालवा कार्यालयावर धडक दिली. परिसरात पाणी संकट असताना अचानक पाणी सप्लाय बंद केल्याने कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना जाब विचारला. ओटवणे भागात कालवा दुरुस्तीची कामे सुरु असल्याने पाणीपुरवठा बंद असल्याचे अभियंता कोरे यांनी सांगितले. आज सायंकाळपासूनच कालव्यातून रोणापालपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे अभिवचन अभियंता कोरे यांनी दिले.
तिलारी कालव्यातून महिनाभरापूर्वी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी टंचाई बर्‍यापैकी आटोक्यात आली होती. मात्र, दुरुस्तीच्या कामांसाठी पंधरा दिवसातच हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सध्या पाणी पातळी बरीच खाली गेल्याने परिसरात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. रब्बी पिकांसह बागायतींना पाणी देणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चराठे येथील कालवा कार्यालयात धडक दिली. कार्यकारी अभियंता कोरे यांना पाणीपुरवठा बंद केल्याबद्दल जाब विचारण्यात आला. आज सायंकाळपासूनच पाणीपुरवठा सुरु करण्याचे अभिवचन कोरे यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले. रविवारपर्यंत पाणी रोणापाल गावापर्यंत पोहचेल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, मडुरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब, संचालक दत्ताराम परब, रोणापाल उपसरपंच कृष्णा परब, माजी सरपंच उदय देऊलकर, ग्रामपंचायत सदस्य योगेश केणी, अरुण पंडीत, सागर गोठसकर, अर्जुन देऊलकर, अमोल शेगडे आदी उपस्थित होते.
-------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT