कोकण

अडूरच्या तरुण वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

CD

४० (पान ३ साठी)


-rat१९p३७.jpg ः
२३M०३८१९
निखिल नार्वेकर
--------------
अडूरच्या वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कर्देतील घटना ; कबड्डीपटू असल्याने क्रीडाक्षेत्रावरही शोककळा

गुहागर, ता. १९ ः तालुक्यातील कर्दे येथे विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून खाली पडल्याने निखिल नार्वेकर, (वय २३, रा. अडूर) या वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (ता. १८) मे रात्री घडली. निखिल उत्तम कबड्डीपटू असल्याने अडूर गावाबरोबरच क्रीडाक्षेत्रात आणि महावितरणमध्ये शोककळा पसरली आहे. आज सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निखिल हा कर्दे परिसरात वायरमन म्हणून महावितरणमध्ये नोकरीला होता. कर्दे गावातील वीजप्रवाह खंडित झाल्याची माहिती त्याला मिळाली. किरकोळ दुरुस्ती असेल असा विचार करून निखिल आपल्या सहकार्याला न घेता कर्दे गावात गेला. तो विजेच्या खांबावर चढला. विजेचा धक्का लागून तो खाली कोसळला. उंचावरून जमिनीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. कर्देतील ग्रामस्थांनी तातडीने त्याला वैद्यकीय उपचारांसाठी चिखली प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत म्हणून घोषित केले. शुक्रवारी (ता. १९) सकाळी चिखली येथेच विच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
निखिल नार्वेकरचे गाव अडूर. तेथील तृप्तीनगर कबड्डी संघाचा तो अष्टपैलू खेळाडू. उत्तम चढाईकार म्हणून गुहागर तालुक्यात त्याची ओळख आहे. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रात्री अनेकांनी कर्दे येथे धाव घेतली. अवघ्या २३व्या वर्षी निखिलचे अपघाती निधन झाल्याने महावितरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तातडीची मदत म्हणून निखिलच्या कुटुंबीयांना महावितरण गुहागरचे कर्मचारी वैयक्तिकरित्या सहभागातून आर्थिक मदत करणार आहेत. दरम्यान, या घटनेची नोंद सुमित्रा यादव, पालशेत यांनी गुहागरला केली असून, अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल जी. डी. कादवडकर करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT