कोकण

ब्रेक निकामी झाल्याने तिलारी घाटात कँटर पलटी

CD

03850
तिलारी ः घाटात उलटलेला कँटर. (छायाचित्र ः संदेश देसाई)

तिलारी घाटात कँटर
उलटून दोघे जखमी

ब्रेक निकामी झाल्याने अपघात

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १९ ः तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे ब्रेक निकामी झाल्याने कँटर पलटी झाला. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. कँटर रस्त्यातच पलटी झाल्याने तो खोल दरीत कोसळण्यापासून वाचला. सुदैवाने चालक व वाहकाला किरकोळ दुखापत झाली.
तिलारी घाटात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या तीन चार महिन्यात अनेक अपघात घडले आहेत. हा घाट रस्ता अतिशय तीव्र उताराचा, अवघड वाळणांचा व अरुंद आहे. कोल्हापूर, बेळगाव ते गोव्याला वाहतुकीसाठी हा मार्ग जवळचा आहे. त्यामुळे या घाटातून वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुगल मॅपवर प्रवास करणाऱ्यांना हा मार्ग जवळचा दाखविला जातो. त्यामुळे परराज्यातून येणारे पर्यटकही या घाटातून प्रवास करीत असतात. परिणामी हा अवघड घाट मार्ग त्या चालकांना अनभिज्ञ असल्याने वळणाचा अंदाज त्यांना येत नाही. त्यामुळे काही जणांच्या जिवावरही बेतले आहे. गोव्याच्या दिशेने वाहतुक करणारा एक कँटर आज तिलारी घाटातून जात होता. तो तीव्र उतार व अवघड वळण असलेल्या जयकर पॉईंट येथे आला असता त्याचे ब्रेक निकामी झाले आणि पलटी झाला. रस्त्यावरच तो पलटी झाल्याने खाली खोल दरीत पडण्यापासून तो वाचला. या अपघातात चालक व वाहकाला किरकोळ दुखापत झाली. या वळणावर वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे वाहने खोल दरीत कोसळू नयेत, यासाठी त्या ठिकाणी मातीचा ढिगारा टाकण्यात आला आहे. याच ढिगाऱ्यामुळे ब्रेक निकामी झालेला कँटर खोल दरीत कोसळण्यापासून वाचला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT