कोकण

जिल्ह्यात 78 पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या

CD

२८ (पान ३ साठी)

जिल्ह्यात ७८ पोलिसांच्या बदल्या

एपीआय, हवालदारांचा समावेश ः कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

रत्नागिरी, ता. २० ः जिल्हा पोलिसदलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय), पोलिस हवालदार दर्जाच्या ७८ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले आहेत. बदल्या झालेल्या कार्मचाऱ्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार या दोन वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये १७ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, ७८ पोलिस हवालदारांचा सामवेश आहे. नव्याने जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारलेल्या पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बदल्यांचे आदेश काढताना कर्मचाऱ्यांनी सुचवलेल्या तीन ठिकाणांपैकी पहिल्या दोन क्रमांकांचा प्राधान्याने विचार केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या पसंतीच्या पहिल्या दोन क्रमांकातच बदली मिळाली आहे. जिल्ह्याच्या दोन्ही भागातील कर्मचाऱ्यांना त्यांचे कुटुंब स्थायिक असलेल्या भागातच नियुक्ती देण्यात आली आहे. बदल्या झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या कर्मचाऱ्यांमध्ये पांडुरंग चव्हाण चिपळूणहून सावर्डे, सूर्यकांत लोटे अलोरेहून गुहागर, भीमराव माने ग्रामीणहून देवरूख, रघुनाथ मौंडुला ग्रामीणहून मुख्यालय, माया हलगी ग्रामीणहून मुख्यालय, दत्ता पवार बाणकोटहून दापोली, भरत जाधव अलोरेहून चिपळूण, मंदार हळदे दापोलीत मुदतवाढ, संदेश सारंग रत्नागिरी शहरहून मुख्यालय, शरद भागवत वाहतूक शाखेतून रत्नागिरी शहर, आश्विनी निखार्गे मुख्यालयातून ग्रामीण, मनिष कांबळे चिपळूणहून सावर्डे, अंकुश महाडिक वाहतूक शाखेतून मुख्यालय, प्रशांत बोरकर एलसीबीतून सुरक्षा शाखेत, संजय कांबळे एलसीबीतून जिल्हा विशेष शाखेत, राजेश सावंत मुख्यालयातून ग्रामीण, प्रकाश मोरे खेडमधून दापोली येथे बदली झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT