कोकण

पावसला एक लाख 30 हजार पर्यटकांची भेट

CD

rat२२p१३.jpg-
०४२७३
पावसः रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिरात दर्शनासाठी झालेली पर्यटकांची गर्दी.
----------
पावस तीर्थक्षेत्री पर्यटकांची मांदियाळी
१ लाख ३० हजार पर्यटकांची भेट; उन्हाळी सुट्टीचा आनंद, गावखडी, गणेशगुळे किनाऱ्यावरही हजेरी
पावस, ता. २२ः शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी पडल्यामुळे कौटुंबिक सहली मोठ्या प्रमाणात कोकणात येत आहेत. त्यामुळे कोकणातील किनारे, धार्मिक पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत असून पावणे दोन महिन्यांमध्ये सुमारे एक लाख तीस हजार पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.
शाळा, पालकांची नोकरी, व्यवसाय यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांना उन्हाळ्याची सुट्टी पडली की मोठ्या प्रमाणात पर्यटक सुट्टी काढून बाहेर पडतात. कोकणातील आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ, सागरकिनारे आदीचा आस्वाद घेण्यासाठी बहुसंख्य पर्यटक कोकणाला प्राधान्य दिसत आहेत. कोरोनाच्या कालावधीनंतर यावर्षी कोकणातील पर्यटनस्थळे विशेषतः समुद्रकिनारे आणि धार्मिक पर्यटनस्थळे हाउसफुल्ल झालेली पाहायला मिळत आहेत.
पावस तीर्थक्षेत्र दिवसेंदिवस चांगल्या तऱ्हेने विकसित होत असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व परराज्यातून अनेक पर्यटक पावसला भेट देत आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये या क्षेत्राला सुमारे पन्नास हजार लोकांनी भेट दिली. मे महिन्यामध्ये ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या महिन्यात आत्तापर्यंत ८० हजार लोकांनी पावस येथील स्वामींच्या मंदिराला भेट दिली आहे. पावसमधून गावखडी, गणेशगुळे, पूर्णगड किल्ला अशी पर्यटनस्थळे याच मार्गावर असल्याने पर्यटकांची पावले पावसकडे वळत आहेत.
-------
कोट
यावर्षी उकाडा प्रचंड वाढूनही पावस पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या दोन महिन्यांमध्ये वाढली आहे. त्यामुळे व्यवसायाला चांगली गती मिळाली आहे. कोकणी मेवा मोठ्या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी नेत आहेत. साहजिकच कोकणी उत्पादने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे.
- शरयू सुर्वे, व्यावसायिक, पावस
------------
कोट
आम्ही येथील बागायतदारांकडून आंबा खरेदी करून या ठिकाणी विक्री करत आहोत. सध्या ५०० ते ८०० रुपये डझन या दराने आंबा विक्री सुरू असून त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- नीलेश नार्वेकर, आंबा विक्रेते, पावस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT