कोकण

माजी नगराध्यक्ष खलिफेंकडून मोफत टॅंकर

CD

४१ (पान ५ साठी)

माजी नगराध्यक्ष खलिफेंकडून मोफत टॅंकर

राजापूर शहर ; दिवसाआड पाण्यामुळे टंचाई

राजापूर, ता. २३ ः शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोदवली येथे नवीन धरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. शहरवासीयांच्या पाणीटंचाईची झळ कमी व्हावी यासाठी कोदवली धरणातील गाळ उपसा करून पाणीसाठा वाढविण्यावर मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र तरीही वाढत्या उष्ण तापमानामुळे शहरात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावात आहेत. यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माजी नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे यांनी ज्या नागरिकांना पाणी मिळत नाही त्या नागरिकांसाठी मोफत टँकरची सोय केली आहे.
शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असून एक दिवसाआडही पाणी वेळेत येत नाही अशी परिस्थिती आहे. काही भागात दोन ते तीन दिवस पाणी येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणीटंचाईतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी माजी नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांनी पुढाकार घेत मोफत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. राजापूरवासीयांची कायमस्वरूपी पाणीटंचाईच्या संकटातून मुक्तता व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे ॲड. खलिफे यांनी सांगितले. ज्या भागात पाणी येणार नाही, त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही ॲड. खलिफे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT