कोकण

बाल शिवाजी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे तायक्वांदोत यश

CD

बाल शिवाजी स्कूलमधील
विद्यार्थ्यांचे तायक्वांदोत यश
कणकवली,ता. २४ ः येथील बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीतील तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश मिळविले. तनिष्का संदीप सावंत (इयत्ता आठवी), कुणाल नीलेश नारकर (इ.दहावी), अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे २१ ते २४ मे दरम्यान घेतलेल्या तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश मिळविले. ही परीक्षा तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्सने आयोजित केली होती. बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, कणकवली ही शाळा नेहमीच विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त संगीत, तायक्वांदो, कराटे, नृत्य या अभ्यासक्रमासाठी विशेष प्रयत्नशील असते. बाह्य उपक्रम व स्पर्धा यात शाळेचे विद्यार्थी सातत्याने यशस्वी होतात. संस्थेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सुलेखा राणे, खजिनदार रमेश राणे, संस्थेचे सदस्य संदीप सावंत, विनायक सापळे, अभिजीत सावंत, संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टता संचालक प्रणाली सावंत, मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

SCROLL FOR NEXT